बातम्या

पुण्यातील धक्कादायक प्रकार, शिक्षिकेकडून विद्यार्थ्याला बेदम मारहाण

A shocking incident in Pune


By nisha patil - 12/4/2024 6:12:09 PM
Share This News:



पुणे हे शिक्षणाचं माहेरघर म्हणून ओळखलं जातं नुकताच पुण्यातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. वर्गात दंगा करत असल्याचे पाहून विद्यार्थी विद्यार्थ्याला मारहाण करण्यात आल्याचा प्रकार पुण्यातील शाळेत घडला. या प्रकारामुळे पालकांनी मोठा संताप व्यक्त रेला आहे. पालकाने विश्रामबाग पोलीस स्टेशनमध्ये शिक्षकेविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. शिक्षिकेला काही शिस्त आहे की नाही, असा प्रश्न पालकांनी उपस्थित केला आहे. 

विद्यार्थी घोळका करून बसले असताना वर्गात दंगा करत असल्याचे पाहून विद्यार्थी विद्यार्थ्याला मारहाण करण्यात आल्याचा प्रकार पुण्यातील शाळेतून समोर आला आहे. याबाबत विद्यार्थ्यांच्या पालकांनी विश्रामबाग पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. हा मारहाण करताना  प्रकार विद्यार्थ्यांनी मोबाईलमध्ये कैद केला. हा व्हिडिओ विद्यार्थ्यांच्या पालकांनी पाहिल्यानंतर त्यांनी विश्रामबाग पोलिसात शिक्षकेविरुद्ध तक्रार दाखल केली. पूजा केदारी असं शिक्षिकेचं नाव आहे. या पूजा केदारी यांनी मुलाला बेदम मारहाण केली आहे. त्यामुळे  संस्थेने त्यांना बडतर्फ करावे, अशी मागणी पालकांनी केली आहे. यापूर्वी देखील या शिक्षिकेने बऱ्याच मुलांना बेदम मारहाण केली आहे, अशी माहिती समोर आल्याचं पालकांना समजलं आहे. पालकाने विश्रामबाग पोलीस स्टेशनमध्ये शिक्षकेविरुद्ध तक्रार दाखल केली आहे


पुण्यातील धक्कादायक प्रकार, शिक्षिकेकडून विद्यार्थ्याला बेदम मारहाण