बातम्या

भाजीपाला विक्रीसाठी पतीसोबत आलेल्या पत्नीचे अपहरण झाल्याची धक्कादायक घटना

A shocking incident of kidnapping of a wife who came with her husband to sell vegetables


By nisha patil - 9/18/2023 4:20:18 PM
Share This News:



कोल्हापूर  आठवडा बाजारासाठी भाजीपाला विक्रीसाठी पतीसोबत आलेल्या पत्नीचे अपहरण झाल्याची धक्कादायक घटना कोल्हापूर जिल्ह्यातील  गडहिंग्लज शहरात घडल्याने खळबळ उडाली आहे. गडहिंग्लज नगरपरिषदेच्या समोरील रोडवर रविवारी पहाटे पावणे सहाच्या सुमारारास ही अपहरणाची घटना घडली. लता लक्ष्मण नवलगुंदे  असे त्या महिलेचं नाव आहे. भाजीपाला व्यवसाय करणारे पती लक्ष्मण शंकर नवलगुंदे यांनी पोलिसात फिर्याद दाखल केली असून दोघा अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
 

लक्ष्मण आणि त्यांची पत्नी लता दोघे मिळून भाजीपाल्याचा व्यवसाय करतात. रविवारी गडहिंग्लजमध्ये आठवडी बाजारासाठी ते पहाटेच भाजीपाला घेऊन आले होते. यावेळी त्यांच्यासोबत एक नातेवाईक महिलाही भाजी घेऊन आली होती. दोघे पती पत्नी दोन ठिकाणी भाजीपाला विक्रीसाठी बसले होते. पती लक्ष्मण नगरपरिषद आवारात भाजीपाला विकत होते, तर पत्नी होळकर चौकात भाजीपाला विकत होती. यावेळी त्यांच्यासोबत आलेली नातेवाईक महिला लघुशंकेला बाजूला गेल्यानंतर तोंड बांधून आलेल्या दोघा अज्ञातांनी लताला जबरदस्तीने ओमनी गाडीत घालून फरार झाले.  महिलेचा आरडाओरडा
जबरदस्तीने अपहरणाचा प्रयत्न झाल्यानंतर लताने आरडाओरडा केला. यावेळी बाजूला गेलेल्या नातेवाईक महिलेने हा प्रसंग लताचे पती लक्ष्मण यांना सांगितला. त्यांनी आपल्या वाहनाने पाठलाग घेत शोध घेण्याचा प्रयत्न केला, पण त्यांना सापडले नाहीत. त्यानंतर त्यांनी पोलिसांकडे धाव घेत फिर्याद दाखल केली. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरु आहे.


भाजीपाला विक्रीसाठी पतीसोबत आलेल्या पत्नीचे अपहरण झाल्याची धक्कादायक घटना