बातम्या

दांडीयासाठी पास असलेल्या प्रत्येक महिलेला चांदीची प्रतिमा

A silver image to every woman with a pass for Dandiya


By nisha patil - 10/19/2023 7:21:03 PM
Share This News:



दांडीयासाठी पास असलेल्या प्रत्येक महिलेला चांदीची प्रतिमा

शिवसेना व उत्तम उत्तुरे फौंडेशनच्यावतीने भव्य दांडीया स्पर्धा

कोल्हापूर ः प्रतिनिधी - शिवसेना (ठाकरे गट) व उत्तम उत्तुरे फौंडेशन यांच्यावतीने मोफत भव्य दांडीया स्पर्धा आयोजित केल्या आहेत. शुक्रवारी (दि. 20) सायंकाळी ६ वा. राजारामपुरी पहिली गल्ली येथील व्ही. टी. पाटील सभागृहात स्पर्धा होणार आहेत. दांडीयासाठी कार्यालयातून पास घेऊन येणार्या प्रत्येक महिलेला चांदीची अंबाबाई देवीची प्रतिमा भेट म्हणून दिली जाणार आहे, अशी माहिती शिवसेना महिला आघाडी शहरप्रमुख प्रतिज्ञा उत्तुरे व उद्योजक महेश उत्तुरे यांनी पत्रकाद्वारे दिली आहे.

यावेळी बेस्ट दांडीया डान्स, बेस्ट ग्रुप, बेस्ट ड्रेस अशा स्पर्धा होणार आहेत. त्याबरोबरच विविध क्षेत्रात उल्लेखनिय कार्य केलेल्या ९ महिलांचा सन्मान करण्यात येणार आहे. स्पर्धेदरम्यान प्रत्येक तासाला लकी ड्रॉ काढण्यात येणार आहे. विजेत्यांना रोख व आकर्षक बक्षिसे दिली जाणार आहेत. फ्री पाससाठी उत्तुरे यांच्या राजारामपुरी ९ व्या गल्लीतील कार्यालयाशी (मोबाईल 9890829293) संपर्क साधावा, असे आवाहनही पत्रकात केले आहे.


दांडीयासाठी पास असलेल्या प्रत्येक महिलेला चांदीची प्रतिमा