बातम्या

एकच शब्द किंग खानला वापरला अन् अख्ख्या बॉलिवूडमध्ये चर्चा!

A single word used by King Khan and discussed in the entire Bollywood


By nisha patil - 9/3/2024 5:50:12 PM
Share This News:



एकच शब्द किंग खानला वापरला अन् अख्ख्या बॉलिवूडमध्ये चर्चा!

अनंत अंबानी  आणि राधिका मर्चेंट  यांच्या प्री-वेडिंगचा दिमाखदार ये कार्यक्रम नुकताच पार पडला. या कार्यक्रमात बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खानने  हजेरी लावली होती. प्री-वेडिंग होस्ट करण्याची जबाबदारी शाहरुखकडे होती. या भर कार्यक्रमात अंबानींच्या सूनेनं किंग खानला 'काका' अशी हाक मारली आहे. बॉलिवूडमध्ये सध्या याच गोष्टीची चर्चा सुरू आहे.
आहे.राधिका 

 

अनंत-राधिकाच्या प्री-वेडिंगचा शाहरुख खान होस्ट होता. कार्यक्रमाच्या मंचावर शाहरुखने अनंत आणि राधिकासोबत संवाद साधला. दरम्यान अनंत-राधिकाने एकमेकांना प्रेमाची कबुलीदेखील दिली. आता सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये राधिका किंग खानला 'काका' अशी हाक मारताना दिसत आहे.राधिका व्हिडीओच्या सुरुवातीला म्हणत आहे,"शाहरुख काका..  आज तुम्ही इथे आहात तर तुमच्या सिनेमातील एक डायलॉग बोलते". त्यानंतर शाहरुख मजेशीर अंदाजात म्हणतो,"आता समोर अक्षय असता तर तू अक्षय कुमारच्या सिनेमातला डायलॉग बोलली असतीस? अक्की प्रेमाने म्हणतोय रे".अनंत-राधिकाच्या प्री-वेडिंगने संपूर्ण जगाचं लक्ष वेधून घेतलं आहे. गुजरातमधील जामनगरमध्ये त्यांच्या प्री-वेडिंगचं आयोजन करण्यात आलं होतं. कार्यक्रमाच्या पहिल्या दिवशी आंतरराष्ट्रीय पॉपस्टार रिहानाने आपल्या गाण्याने उपस्थित असलेल्या मंडळींचं मनोरंजन केलं. दुसऱ्या दिवशी शाहरुख खान, सलमान खान, आमिर खान, दिलजीत दोसांझने खास सादरीकरण केलं. विविध क्षेत्रातील दिग्गज मंडळी प्री-वेडिंगला उपस्थित होते.


एकच शब्द किंग खानला वापरला अन् अख्ख्या बॉलिवूडमध्ये चर्चा!