शैक्षणिक
विवेकानंद महाविद्यालयात विशेष श्रमसंस्कार शिबीर संपन्न
By nisha patil - 1/24/2025 6:06:01 PM
Share This News:
विवेकानंद महाविद्यालयात विशेष श्रमसंस्कार शिबीर संपन्न
कोल्हापूर, दि. २४ : विवेकानंद महाविद्यालयाच्या वसगडे येथील विशेष श्रमसंस्कार शिबिराच्या समारोप प्रसंगी डॉ. टी. एम. चौगले, संचालक, राष्ट्रीय सेवा योजना, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर यांनी विद्यार्थ्यांना राष्ट्रीय सेवा योजनेंतर्गत विविध सामाजिक उपक्रमांचे महत्त्व सांगितले. शिबिरात ग्राम सफाई, आरोग्य शिबीर, वृक्षसंवर्धन, जलसाक्षरता, पर्यावरण जागृती आणि अंधश्रद्धा निर्मूलनासारखे उपक्रम राबवले गेले.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. आर. कुंभार यांनी विद्यार्थ्यांना समाजसेवेत सहभागी होण्याचे आवाहन केले. शिबिरास हितेंद्र साळुंखे, आर. बी. जोग, . एस. पी. देसाई यांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुयश झुणके यांनी केले, तर प्रा. डॉ. जी. एस. उबाळे यांनी आभार मानले.
विवेकानंद महाविद्यालयात विशेष श्रमसंस्कार शिबीर संपन्न
|