बातम्या
श्री शिवपार्वती दूध संस्थेकडून यात्रेची खास भेट
By nisha patil - 4/19/2024 4:36:58 PM
Share This News:
कोल्हापूर : प्रतिनिधी उंचगाव मधील ग्रामदैवत श्री मंगेश्वर या देवालयाची त्रैवार्षिक यात्रा आजपासून सुरू झाली या मंदिराची यात्रा मागील काळामध्ये कोरोनामुळे झाले नसल्यामुळे या वेळेला मोठ्या दणक्यात ही यात्रा ग्रामस्थ गावकरी यांच्यावतीने मोठ्या उत्साहात साजरी होत आहे तरी ग्रामीण भागामध्ये शेतकरी हा मुख्य स्त्रोत असून त्याची जनावरे हेच पशुधन आहे आणि ह्या पशुधनापासून त्यांना रोजगाराची निर्मिती करता येत आहे, उंचगांव गाव हे शहरालगत असल्यामुळे या ठिकाणी जनावरे पाळणे त्यांचे संगोपन करणे खूप अडचणीचे ठरत आहे परिणामी या गावातील दूध संस्थांमध्ये दुधाचा तुटवडा जाणवत आहे तरी देखील या गावातील दूध उत्पादक आपल्या जनावरांना आपल्या लेकराबाळासारखं सांभाळून त्यांचे संगोपन करून त्यामधून आपल्या संसाराचा आर्थिक गाडा ओढण्याचं काम आज पर्यंत करत आले आहेत याच दूध व्यवसायातून दूध उत्पादक आपल्या गावातील श्री शिवपार्वती महिला सहकारी दूध संस्था उंचगांव या संस्थेचे संस्थापक माननीय प्रकाश शंकरराव पाटील (तात्या) यांच्या प्रेरणेतून 2000 सली या संस्थेची स्थापना झाली या संस्थेतून आजपर्यंत दूध उत्पादकांना वेगवेगळ्या पद्धतीने सहकार्य तात्यांच्या माध्यमातून होत गेलेलं आहे आणि याचाच वसा आणि वारसा जपत त्यांचे पुत्र अभिजीत प्रकाश पाटील महाराष्ट्र नवनिर्माण सेना करवीर तालुका अध्यक्ष यांनी या संस्थेचा गाडा पुढे हाकत आणलेला आहे या यात्रेनिमित्त दूध उत्पादकांना खास भेट म्हणून त्यांच्यामार्फत संस्थेकडून त्यांनी दूध उत्पादकांना मोठ्या साईजची चांगल्या गुणवत्तेची चटई भेटवस्तू म्हणून देण्यात आली यावेळी संस्थेच्या चेअरमन श्रीमती सुमन प्रकाशराव पाटील यांनी व व्हाईस चेअरमन सौ. शशिकला वसंत गुरव व सुभाष पाटील श्री प्रसाद पाटील (गोगा) आनंदा पाटील सचिव यांनी चटईचे दूध संस्थेच्या दारामध्ये दूध उत्पादकांना भेट स्वरूपात वाटप केले. यावेळी दूध उत्पादक संजय भोसके, मंगल माळी,तुषार पाटील, सागर सुतार,मीना पाटील,शरद भोसले,कुसुम चौगुले, माधुरी म्हाकवे, संतोष माने, शुभांगी भोगम, प्राजक्ता जाखले,साहिल मुल्लाणी,बाळू मोंगले, विश्वास संकपाळ,भारती संकपाळ, राजकुमार भोसके, समर्थ चव्हाण व अन्य दूध उत्पादक सभासद उपस्थित होते सभासदांनी संस्थेबाबत विश्वास दाखवल्याबद्दल संस्थेच्या चेअरमन श्रीमती सुमन प्रकाश पाटील यांनी सर्व दूध उत्पादकांचे आभार मानले व असाच विश्वास आपल्या संस्थेवरती ठेवून आपल्या संस्थेची उत्तरोत्तर प्रगती होण्यासाठी आपल्या सगळ्यांचे योगदान खूप महत्त्वाचे आहे इथून पुढच्या काळामध्ये आपल्याला कोणत्याही अडचणी आल्या तर शिवपार्वती दुध संस्था व माझा परिवार आपल्या पाठीशी ठाम पणाने उभा आहे असे आश्वासित केले त्यामुळे सर्व सभासदांनी संस्थेबाबत व पाटील कुटुंबीयांच्या बाबत कौतुकाचे समाधान व्यक्त केले.
श्री शिवपार्वती दूध संस्थेकडून यात्रेची खास भेट
|