बातम्या
इनरव्हील क्लब ऑफ कोल्हापूर सनराइजची "Orange the World" जागतिक मोहिमेअंतर्गत विशेष उपक्रम
By nisha patil - 12/12/2024 12:53:20 PM
Share This News:
इनरव्हील क्लब ऑफ कोल्हापूर सनराइजची "Orange the World" जागतिक मोहिमेअंतर्गत विशेष उपक्रम
कोल्हापूर – इनरव्हील क्लब ऑफ कोल्हापूर सनराइजच्या वतीने जागतिक मोहिम "Orange the World" अंतर्गत, शीला देवी शिंदे सरकार हायस्कूलमध्ये "मुली आणि स्त्रियांवरची हिंसा रोखण्यासाठी एकत्र या" या विषयावर विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे नेतृत्व क्लबच्या प्रेसिडेंट स्मिता सावंत व सेक्रेटरी नंदिनी पाटील यांनी केले.
कार्यक्रमामध्ये नंदिनी पाटील लिखित "प्लीज, माझं थोडं ऐकून घेता का" या स्क्रिप्टचे विद्यार्थिनींनी सादरीकरण केले. यामधून स्त्रियांवर होणाऱ्या हिंसेविरोधात एकत्र येण्याचा संदेश देण्यात आला. मुलींनी "असा प्रसंग आला तर आम्ही एकत्र येऊन काम करू" असा संकल्प करत स्वाक्षरी मोहिमेत सहभाग घेतला. विशेष म्हणजे, सहा वर्षांच्या राजविकाने या मोहिमेचे महत्त्व जाणून स्वतःची सही केली.
कार्यक्रमादरम्यान पोस्टरद्वारे जागरूकतेचा प्रयत्नही करण्यात आला. "Safety, Anytime, Anywhere" ही प्रमुख मागणी कार्यक्रमातून मांडण्यात आली.
कार्यक्रमाला अतिशय चांगला प्रतिसाद मिळाला. क्लब प्रेसिडेंट स्मिता सावंत, सेक्रेटरी नंदिनी पाटील, एडिटर पूनम सरनाईक, तसेच क्लबच्या सदस्य प्रिया खबाले व संध्या देवडकर उपस्थित होत्या. शाळेच्या वतीने जगदीश मॅडम यांनी उपस्थितांचे स्वागत करत कार्यक्रमाची ओळख करून दिली.
या उपक्रमातून मुलींमध्ये हिंसेविरोधातील जागरूकता व एकत्र येण्याची भावना निर्माण झाली असून, कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल इनरव्हील क्लबचे कौतुक होत आहे.
इनरव्हील क्लब ऑफ कोल्हापूर सनराइजची "Orange the World" जागतिक मोहिमेअंतर्गत विशेष उपक्रम
|