बातम्या

पर्यावरण दिनानिमित्त अमृता फडणवीस यांची खास पोस्ट

A special post by Amrita Fadnavis on the occasion of Environment Day


By nisha patil - 5/6/2023 6:33:48 PM
Share This News:



तारा न्यूज वेब टीम  उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  यांच्या पत्नी गायिका अमृता फडणवीस सोशल मीडियावर त्यांनी गायलेली वेगवेगळी गाणी सोशल मीडियावर शेअर करत असतात. अमृता फडणवीस या सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असतात. विविध विषयांवर आधारित पोस्ट त्या सोशल मीडियावर शेअर करतात. आज  जागतिक पर्यावरण दिनानिमित्त  अमृता फडणवीस यांनी एक खास पोस्ट शेअर केली आहे. त्यांच्या या पोस्टनं अनेकांचे लक्ष वेधले आहे. अमृता फडणवीस यांनी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त त्यांचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोला त्यांनी कॅप्शन दिलं,  'काही लोक मानवनिर्मित जगात हरवून जातात तर काही निसर्गाच्या जंगलात स्वतःला शोधण्यासाठी भटकतात! पर्यावरणावर प्रेम करा, स्वतःला शोधण्यासाठी आणि आपल्या जीवनाचा उद्देश शोधण्यासाठी पर्यावरणााचे संरक्षण करा!' असं कॅप्शन अमृता यांनी या फोटोला दिलं आहे.  अमृता फडणवीस यांनी शेअर केलेल्या फोटोवर अनेक नेटकऱ्यांनी लाइक आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.


पर्यावरण दिनानिमित्त अमृता फडणवीस यांची खास पोस्ट