शैक्षणिक
हम्बोल्ट फेलोशिपच्या अनुषंगाने विद्यापीठात उद्या विशेष परिसंवाद ....
By nisha patil - 6/3/2025 7:23:07 PM
Share This News:
हम्बोल्ट फेलोशिपच्या अनुषंगाने विद्यापीठात उद्या विशेष परिसंवाद ....
संशोधक विद्यार्थ्यांनी या परिसंवादाचा लाभ घ्यावा
शिवाजी विद्यापीठाचे स्कूल ऑफ नॅनोसायन्स ,बायोटेक्नॉलॉजी इंटरनॅशनल अफेअर सेल आणि हम्बोल्ट अकॅडमी व महाराष्ट्र अकॅडमी ऑफ सायन्स यांच्या संयुक्त विद्यमाने पीएम उषा योजनेच्या माध्यमातून उद्या शुक्रवारी दि. 7 अलेक्झांडर वॉन हम्बोल्टस पोस्टडॉक्टरल फिलोशीप या प्रतिष्ठित फेलोशिपच्या अनुषंगाने मार्गदर्शन करण्यासाठी परिसंवाद आयोजन करण्यात आलं आहे. शिवाजी विद्यापीठ आणि संलग्नित महाविद्यालयातील नुकत्याच पीएचडी पदवी प्रदान केलेल्या पीएचडी शोध प्रबंध जमा केलेले आणि पीएचडी करत असलेल्या विद्यार्थ्यांनाही या परिसंवादाचा लाभ होणार आहे.
भौतिकशास्त्र आदी विभागाच्या सभागृहात सकाळी 11 ते सायंकाळी ५.३० या वेळेत हा परिसंवाद होणार आहे. ही माहिती बायोटेक्नॉलॉजी आणि रिसर्च अँड डेव्हलपमेंट सेलचे संचालक डॉक्टर किरण कुमार शर्मा आणि इंटरनॅशनल अफेयर्सचे संचालक डॉक्टर एस डी सादळे यांनी दिली आहे.विद्यापीठातील व संलग्नित महाविद्यालयातील अधिकाधिक संशोधक विद्यार्थ्यांनी या परिसंवादाचा लाभ घ्यावा असे आव्हान डॉक्टर शर्मा यांनी केले आहे.
हम्बोल्ट फेलोशिपच्या अनुषंगाने विद्यापीठात उद्या विशेष परिसंवाद ....
|