बातम्या
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री नामदार एकनाथजी शिंदे यांना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया च्या वतीने निवेदन! .....
By nisha patil - 6/15/2023 6:22:22 PM
Share This News:
कोल्हापूर प्रतिनिधी महाराष्ट्रा मधील वाढता जातीय आणि धार्मिक तणाव तसेच दलित समाजासह विशेषतः मातंग समाजावरील वाढते अन्याय अत्याचार रोखण्यासाठी राज्य शासनाने ठोस उपाय योजना कराव्यात याकरिता रिपब्लीकन पार्टी अॅाफ इंडिया (आठवले) च्या वतीने महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री ना. एकनाथजी शिंदे यांना निवेदन देण्यात आले.
नांदेड येथील अक्षय भालेराव या युवकाची हत्या केवळ डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी केल्याने काही विकृत असामाजिक तत्त्वाने केली. मुंबईमध्ये सावित्रीबाई फुले वस्तीग्रहामधील मागासवर्गीय विद्यार्थिनीवर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली. बीड जिल्हयातील मातंग समाजातील अल्पवयीन मुलीवर अत्याचार करुन विहिरीत ढकलून तिचा खून करण्यात आला. या सर्व घटना माणुसकीला काळीमा फासणार्या असून, दलित समाजाला संरक्षण देण्यात सरकार अपयशी ठरत आहे हि खेदाची बाब आहे. तसेच कल्याण आणि महाराष्ट्राच्या इतर भागातही दलितांच्या वर अत्याचार झालेले आहेत. हे थांबवण्यासाठी सरकारने विशेष उपाययोजना कराव्यात. त्याच पद्धतीने यामुळे निर्माण झालेला तणाव कमी करण्यासाठी राज्यभरातून सलोखा परिषदेचे आयोजन करावे ही भूमिका रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष नामदार रामदासजी आठवले साहेब यांनी मांडलेली आहे. त्यानुसार अशा परिषदांचे आयोजन करावे, असे निवेदन रिपब्लिकन पक्षाच्या वतीने मा. मुख्यमंत्री यांना देण्यात आले. त्याच बरोबर कोल्हापूर मध्ये 3 जानेेवारी 2018 साली भीमा कोरेगाव प्रश्नावरून झालेल्या आंदोलनातून निष्पाप, बेकसुर अशा 1800 भीमसैनिकांच्यावर खोटे गुन्हे नोंद केलेले आहेत. हे गुन्हे मागे घेण्याच्या संदर्भात राज्य सरकारने पुढाकार घ्यावा. पालकमंत्री नाम. दीपकजी केसरकर यांना तशा सूचना कराव्यात अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राज्य संघटन सचिव प्रा. शहाजी कांबळे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाध्यक्श उत्तमदादा कांबळे, पश्चिम महाराष्ट्र महिला आघाडी अध्यक्शा रुपाताई वायदंडे यांनी मुख्यमंत्री महोदय यांचेकडे आज निवेदनाद्वारे केली.
यावेळी उच्च व तंत्र शिक्षणमंत्री ना. चंद्रकांतदादा पाटील, राधानगरी - भुदरगड - आजरा मतदारसंघाचे आमदार प्रकाशरावजी आबीटकर, खा. संजय मंडलिक, मा. आमदार चंद्रदीप नरके, जिल्हाधिकाऱी राहुल रेखावार, जिल्हा पोलीस प्रमुख महेंद्र पंडीत, रिपब्लीकन पक्शाचे राज्य सचिव मंगलराव माळगे, जिल्हा उपाध्यक्ष दत्ता मिसाळ, युवक आघाडी जिल्हाध्यक्ष अविनाश शिंदे, कामगार आघाडीचे शहराध्यक्श प्रदीप मस्के, बटू भामटेकर, बाबासाहेब धनगर, साताप्पा हेगडे, शेरु हळदिकर आदी ऊपस्थित होते.
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री नामदार एकनाथजी शिंदे यांना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया च्या वतीने निवेदन! .....
|