बातम्या

शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने कोल्हापुर महगरपालिकेच्या प्रशासकांना निवेदन 

A statement on behalf of the Shiv Sena Thackeray group to the administrators of the Kolhapur Mahagarpalika


By surekha - 7/13/2023 5:22:21 PM
Share This News:



शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने कोल्हापुर महगरपालिकेच्या प्रशासकांना निवेदन 

शंभर कोटींच्या निवेदांचा फेरविचार करावा आणि या निविदा पुन्हा प्रसिद्ध कराव्यात या मागणीसाठी शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने कोल्हापुर महगरपालिकेच्या प्रशासकांना निवेदन देण्यात आल.या निवेदनात प्लॉट वीस किलोमीटर पर्यंतच असावा असे कोणत्या कायद्यामध्ये आहे.स्वताःचा प्लॉट असावा तो भाडे तत्वावर घेवू नये असे कोणत्या कायदयात आहे?निवीदा प्रसिध्द करताना सर्व रस्त्यांचे अंदाजपत्रक जाहीर केले होते का ?
ज्या रस्त्यासाठी निविदा काढली आहे त्यातील काही रस्ते पूर्ण झाले आहेत, मग पून्हा या निविदामध्ये या रस्त्यांचा उल्लेख कसा ?तांत्रिक मंजूरी सार्वजनिक बांधकाम कडून घेतली असेल तर त्याच निकषा प्रमाणे निविदा प्रसिध्द केली आहे का ? 6 कोटींचा भराव कोणत्या रस्त्यासाठी वापरणार आहात या बाबतचा खुलासा प्रशासनाने लवकरात लवकर करावा अशा मागण्या निवेदनादवारे करण्यात आल्या.यावेळी संजय पवार,विजय देवणे, रविकिरण इंगवले, विशाल देवकुळे, मंजित माने, अवधूत साळोखे, राहुल माळी, दीपक धिंग, शशिकांत बिडकर, दिनेश साळोखे, सुनील कानूरकर, प्रतिज्ञा  उतुरे, स्मिता सावंत मांडरे , अश्विनी घोटगाळकर, स्वरूपा खुरंदळे,संतोष कांदेकर, प्रीती क्षीरसागर वर्षा पाटील यांच्यासह शिवसैनिक पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने कोल्हापुर महगरपालिकेच्या प्रशासकांना निवेदन