बातम्या
३१ जानेवारी पूर्वी कचरा व्यवस्थापन प्रश्र्नी उपाय योजना करा ; मनसेच्या वतीने महानगरपालिकेला निवेदन
By neeta - 9/1/2024 5:43:58 PM
Share This News:
कोल्हापूर: घरबसल्या फुकटचा पगार येऊन महापालिकेचे दरमहा लाखो नुकसान करणाऱ्या कर्मचाऱ्यांना घरी बसवा आणि त्याऐवजी प्रामाणिक रोजदारी कर्मचाऱ्यांना कायम सेवेत सामावून घ्या अशी मागणीचे निवेदन मनसेच्या वतीने महानगरपालिका आयुक्त यांना देण्यात आले.
कोल्हापुरातील कचरा समस्या गंभीर बनत चालली आहे. कचरा टाकण्यासाठी पुरेशी जागा नाही त्यामुळे कचराचा उठाव वेळेत होत नाही वाढत्या कचऱ्यामुळे आरोग्याच्या समस्या निर्माण होउन आरोग्याचा धोका वाढला आहे. . कसबा बावडा येथील कचरा प्रक्रिया प्रकल्पाची क्षमता संपल्याने कचऱ्याची विल्हेवाट लावण्याचा प्रश्न महापालिकेसमोर आहे. पुरेशी जागा नसल्याने वेळेवर कचराचा उठाव होत नाही. त्यामुळे अनेक ठिकाणी कचरा उठाव होत नसल्याने दुर्गंधीचे साम्राज्य पसरले आहे.
यामुळे कसबा बावडा, प्रतिभानगर राजेंद्रनगर, जवाहरनगर ,जरगनगर साने गुरुजी वसाहत, फुलेवाडी या परिसरात भटक्या कुत्र्यांची दहशत निर्माण झाली आहे. याचं सर्वसामान्य नागरिकांना त्याचा त्रास होऊ लागला आहे. नागरिकांना कचऱ्याच्या दुर्गंधीतून कोल्हापूरात अक्षरशः नाकाला हात लावून प्रवेश करावा लागतो. अशी स्थिती गांधीनगर वळणगे ,उचगाव ,उजळवाडी, सरनोबतवाडी,मोरेवाडी पाचगाव, उजगाव, येथे मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते.
तरी या प्रश्नाचा महानगरपालिका आरोग्य विभागाने गांभीर्याने विचार करून येथे 31 जानेवारी पूर्वी कचरा व्यवस्थापन प्रश्न ठोस उपाय योजना कराव्यात. तसेच घरबसल्या फुकटचा पगार घेऊन महापालिकेचे दर महा लाखो नुकसान करणाऱ्या कर्मचाऱ्यांना घरी बसवा आणि त्यावरील प्रामाणिक रोजदारी कर्मचाऱ्यांना कायम सेवेत सामावून घ्या, ज्या रोजदारी कर्मचाऱ्यास रोजदारीमुळे कामाकडे दुर्लक्ष होतं आणि कचरा उठाव होत नाही अशा दोशींवर कठोर कारवाई होणे आवश्यक आहे. ३१ जानेवारीपूर्वी कचरा व्यवस्थापन प्रश्न उपाययोजना कराव्यात अन्यथा मनसेच्या वतीने धरणे आंदोलन, सह्याची मोहीम, घंटानाद यासारखी आंदोलन करण्यात येतील .असा कडक इशारा मनसेच्या वतीने महानगरपालिकाला देण्यात आला
३१ जानेवारी पूर्वी कचरा व्यवस्थापन प्रश्र्नी उपाय योजना करा ; मनसेच्या वतीने महानगरपालिकेला निवेदन
|