बातम्या

कसबा बावड्याचा शुगरमिल चौकात धर्मवीर संभाजी महाराजांचा पुतळा बसविणार : राजेश क्षीरसागर

A statue of Dharmaveer Sambhaji Maharaj will be installed at the Sugarmill Chowk of Kasba Bawda


By nisha patil - 8/16/2024 7:29:45 PM
Share This News:



कोल्हापूर दि.१६ : कसबा बावडा आणि शिवसेनेचं, माझं नात जिव्हाळ्याच आहे. निवडणुकीपुरताच कधी कसबा बावडावासियांचा विचार न करता बावडावासीयांच्या प्रत्येक सुखदु:खात सहभागी झालो आहे.  त्यामुळेच कसबा बावडा नेहमीच माझ्या पाठीशी उभा राहिला आहे. पूरस्थिती आणि कोरोना काळात कसबा बावडा वासीयांच्या सोबत राहिलो हे मी माझं कर्तव्य मानतो. स्वातंत्र दिन कसबा बावडावासीयांच्या सोबत जल्लोषात साजरे करण्याचे नियोजन केले. यास बावडा वासियांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. राजाराम बंधारा पुलास निधी, रस्ते, ड्रेनेज गटर आदी माध्यमातून कसबा बावड्यातील विकास कामे केली आहेत. कसबा बावडा परिसराचा विकास व्हावा हे ध्येय जोपासले आहे. येत्या वर्षभरात कसबा बावड्याच्या शुगरमिल चौकात धर्मवीर संभाजी महाराजांचा पुतळा बसविणार असल्याचे प्रतिपादन राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर यांनी केले. 

    स्वातंत्र्य दिनानिमित्त शिवसेनेच्या वतीने कसबा बावड्यात भारत मातेच्या शोभा यात्रेचे आयोजन करणात आले होते. या यात्रेच्या निमित्ताने कसबा बावड्यात शिवसेनेच्या वतीने देशभक्तीपर वातावरण निर्मिती करण्यात आली. सायंकाळी शिवनेरी शिवसेना विभागीय कार्यालय कसबा बावडा येथे भारतविर ढोल- ताशा पथकाच्या वादनाने कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली. यात्रेकरिता सजवलेल्या ट्रॅक्टरवर भारत मातेची प्रतिमेचे पूजन करण्यात आले होते. हातात तिरंगा झेंडा घेवून शोभा यात्रेत महिलांची संख्या लक्षणीय होती. यावेळी "वंदेमातरम्", "भारत माता कि जय" अशा घोषणांनी कसबा बावडा परिसर दणाणून सोडला यानंतर भगवा चौक, मेन रोड मार्गे भाजी मंडई मार्गे यात्रा शिवसेना विभागीय कार्यालय येथे समाप्त करण्यात आली. 

    यावेळी बोलताना राजेश क्षीरसागर यांनी, मराठा साम्राज्याचे दुसरे छत्रपती धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज राज्यातील तमाम जनतेसाठी प्रेरणास्थान आहेत. अशा महान राजाचे स्मृती चिरंतन रहाणेसाठी व यापुढील पिढीला त्यापासून प्रेरणा मिळणेसाठी हिंदुत्ववादी कसबा बावड्याच्या शुगर मिल चौकात धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळा येत्या वर्षभरात बसवू. कसबा बावड्याचे प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी नेहमीच प्राधान्य दिले आहे. आगामी काळात कसबा बावड्यातील पाणंदींचा विकास करण्यात येणार आहे. यासह एस.टी.प्लांट मधून पाण्याचे शुद्धीकरण करून ते पाणी मोफत शेतकऱ्यांना उपलब्ध करण्याचा आपला प्रयत्न आहे. कसबा बावडा वासियांवरील प्रेम अतूट असून, या परिसराच्या विकासासाठी सदैव कटिबद्ध राहू, असेही श्री.राजेश क्षीरसागर यांनी सांगितले.
 


कसबा बावड्याचा शुगरमिल चौकात धर्मवीर संभाजी महाराजांचा पुतळा बसविणार : राजेश क्षीरसागर