बातम्या

परराज्यातील अट्टल मोटर सायकल चोरट्यास अटक...

A staunch motorcycle thief from a foreign state arrested


By nisha patil - 4/24/2024 9:25:45 PM
Share This News:



 स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील पोलीस अंमलदार सुरेश पाटील व सागर माने यांना खात्रीशिर माहिती मिळाली की आरोपी आवन्ना उर्फ रवी चंदरगी, रा. गोकाक, जि. बेळगाव,  हा चोरीतील स्प्लेंडर मोटर सायकल घेवून  गडहिंग्लज ते संकेश्वर जाणारे रोडवरील निलजी फाटा येथील बसस्टॉपवर येणार आहेत.  त्यांनी सापळा रचून आरोपी  आवन्ना उर्फ रवी उध्दाप्पा चंदरगी वय 50, रा. बेटगेरी राज्य-कर्नाटक यास नंबर प्लेट नसलेल्या काळे रंगाचे स्प्लेंडर मोटर सायकलसह ताब्यात घेतले.त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता स्प्लेंडर मोटर सायकल ही चोरीची असून सदर बाबत लक्ष्मीपुरी पोलीस ठाणे प्रमाणे गुन्हा दाखल असलेची माहिती मिळाली असून  त्यास ताब्यात घेतले आहे . सदरचा आरोपी हा  सराईत गुन्हेगार असलेने त्याचेकडे  अधिक तपास केला असता त्याने सदर गुन्ह्यासह एकूण सहा लाख 80 हजार किमतीच्या एकूण 17 मोटर सायकल चोरीचे गुन्हे केलेची माहिती सांगितली आहे.


परराज्यातील अट्टल मोटर सायकल चोरट्यास अटक...