विशेष बातम्या

मित्र-मैत्रीणींच्या ग्रुपची भन्नाट गोष्ट; तमन्ना भाटियाच्या 'जी करदा' चा ट्रेलर रिलीज

A strange story of a group of friends Trailer release of Tamannaah Bhatia s Jee Karda


By nisha patil - 5/6/2023 6:36:58 PM
Share This News:



तारा न्यूज वेब टीम बॉलिवूड आणि दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री तमन्ना भाटिया ही तिच्या स्टाईलनं आणि अभिनयानं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकते. नुकताच तमन्ना भाटियाच्या  'जी कारदा' या वेब सीरिज  ट्रेलर रिलीज झाला आहे. या ट्रेलरमध्ये सात मित्रांची कथा आणि त्यांचा जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन दाखवण्यात आला आहे. ही वेब सीरिज ओटीटी प्लॅटफॉर्मवर 15 जूनला रिलीज होणार आहे.'जी कारदा' या वेब सीरिजची संपूर्ण कथा सात मित्रांभोवती फिरते. या वेब सीरिजमध्ये रोमान्स आणि मैत्रीसोबतच आयुष्यातील समस्याही दाखवण्यात आल्या आहेत. 
 तमन्ना भाटियाच्या व्यतिरिक्त या सीरिजमध्ये आशिम गुलाटी, सुहेल नय्यर, अन्या सिंग, हुसैन दलाल आणि सायन बॅनर्जी या कलाकारांच्याही भूमिका आहेत. या वेब सीरिजचे दिग्दर्शन अरुणिमा शर्मा यांनी केले आहे. 'जी कारदा' वेब सीरिजचे 8 एपिसोड्स असणार आहेत. 'जी कारदा' या तमन्ना भाटियाच्या वेब सीरिजची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. तमन्ना भाटियानं सोशल मीडियावर 'जी कारदा' या वेब सीरिजचा ट्रेलर शेअर केला आहे. या ट्रेलरला कमेंट करुन अनेकांनी तिच्या या आगामी वेब सीरिजसाठी तिला शुभेच्छा दिल्या आहेत.


मित्र-मैत्रीणींच्या ग्रुपची भन्नाट गोष्ट; तमन्ना भाटियाच्या 'जी करदा' चा ट्रेलर रिलीज