बातम्या
कोल्हापुरात दूध भात खाल्ल्याने श्वास गुदमरून चिमुकलेचा मृत्यू
By nisha patil - 8/1/2024 3:20:38 PM
Share This News:
कोल्हापुरात दूध भात खाल्ल्याने श्वास गुदमरून चिमुकलेचा मृत्यू
कोल्हापूर : चक्क दूध भात खाताना श्वास गुदमरून ११ महिन्याच्या चिमुकलीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडल्याचा समोर आले आहे.आपलं लहान बाळ जेव्हा जेवत नाही तेव्हा आई त्या बाळाला प्रेमाने कुशीत बसून त्याला जेऊ घालत असल्याचं आपणं पाहतो. पण तेच जेवू त्या मुलाच्या जीवाला बेतल असे त्या निष्पाप आईला वाटले नसावं
आपली लहान मुलगी जेवत नाही म्हणून आई चिमुकलीला दूधभात खाऊ घालत होती. अकरा महिन्याच्या या चिमुकलीला दूध भात खाताना ठसका लागला आणि श्वास गुदामुरून तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. कोल्हापुरातील कदमवाडी गावातील ही दुर्देवी घटना घडली आहे.
अकरा महिन्याची चिमुकली सानवी ही जेवत नाही म्हणून तिच्या आईने तिला दूध भात खाऊ घातला, दूध भात खाताना सानवी अचानक जोराचा ठसका आला आणि अचानक श्वसनाचा त्रास सुरू झाला आणि ती अत्यवस्थ होऊ लागली. या घटनेनंतर नातेवाईकांनी सानवी हिला उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल केले. मात्र खाजगी रुग्णालयात त्यांना सीपीआर रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिला. सीपीआर मध्ये डॉक्टरांनी तपासणी करण्यापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे सांगितले. स्मशानाचा त्रासामुळे तिचा मृत्यू झाला असावा असा डॉक्टरांचा प्राथमिक अंदाज आहे. या घटनेची नोंद सीपीआर पोलीस चौकीत झाली आहे
कोल्हापुरात दूध भात खाल्ल्याने श्वास गुदमरून चिमुकलेचा मृत्यू
|