बातम्या

राधानगरी जंगलातील प्राणीगणनेत एकूण 184 विविध प्राण्यांची गणना

A total of 184 different animals were enumerated in Radhanagari forest fauna census


By nisha patil - 5/29/2024 9:33:14 PM
Share This News:



 कोल्हापूर वन्यजीव विभागामार्फत दरवर्षी मे महिन्यामध्ये बुध्द पौर्णिमेदिवशी रात्री राधानगरी अभयारण्यामध्ये प्राणीगणनेचा कार्यक्रम केला जातो. प्राणीगणनेमध्ये निसर्गप्रेमींना एक दिवस जंगलात राहण्याचा तसेच प्राण्यांचे दर्शन, आवाज, वनसंपदा व जैवविविधतेचा अनुभव मिळतो. दरवर्षी प्राणीगणनेस उदंड प्रतिसाद मिळतो. यातून जनसामान्यांना वन्यप्राणी व जंगलामध्ये वनविभागामार्फत करण्यात येत असलेली कामे, वनसंपदा टिकवण्यासाठी वनविभागाकडून करण्यात येत असलेले प्रयत्न याची माहिती होते. या गणनेमध्ये एकूण 184 विविध प्रकारचे प्राणी व पक्ष्यांची गणना करण्यात आल्याची माहिती विभागीय वन अधिकारी (वन्यजीव) एस.एस.पवार यांनी दिली आहे.

सालाबादप्रमाणे यावर्षीही कोल्हापूर वन्यजीव विभागाअंतर्गत 22 मे रोजी बुध्द पौणिमेनिमित्त प्राणी गणना आयोजित करण्यात आली होती. ही प्राणी गणना राधानगरी जंगलातील विविध ठिकाणी एकूण 26 पाणस्थळांवर घेण्यात आली. यामध्ये एकूण 50 वनविभागाचे अधिकारी व वनकर्मचारी व 26 प्रगणकांनी (स्वयंसेवक) आपला सहभागी झाले होते.

 या कालावधीत दिसलेल्या वन्यप्राणी, पक्षी इत्यादींची माहिती खालीलप्रमाणे आहे-

रानगवा - 71, रानकोंबडा- 22, ससा-6,  भेकर -5, उदमांजर- 2, वटवाघूळ -1, घुबड -2, गरुड -1, साळींदर -1, मोर-9, घोणस- 1, वानर-1, सांबर -5, शेकरु -5, चिमणी -3, डुक्कर -5, घार -1, गेळा -1, रानडुक्कर -1, कापूगोडा -1, अस्वल -9, वेडा राघू -1, सातभाई -4, कासव -2, खंड्या -1, रानकुत्रा -17, मुंगूस -1, शिंगडा घुबड -1, धनेश- 1 व पक्षी 3 इतके प्राणी व पक्ष्यांची गणना करण्यात आल्याची माहिती वनविभामार्फत देण्यात आली आहे.


राधानगरी जंगलातील प्राणीगणनेत एकूण 184 विविध प्राण्यांची गणना