बातम्या
कृष्णा कला क्रीडा सांस्कृतिक आणि सामाजिक संस्था कोल्हापूर यांचा अनोखा उपक्रम
By nisha patil - 11/30/2023 4:57:37 PM
Share This News:
कृष्णा कला क्रीडा सांस्कृतिक आणि सामाजिक संस्था कोल्हापूर यांचा अनोखा उपक्रम
कोल्हापूरमध्ये पहिल्यांदाच आपल्या मातीतले खेळ
महिलांचा आणि मुलांचा उत्स्फूर्तपणे सहभाग
कृष्णा फाउंडेशनच्या संचालिका अध्यक्षा सोनाली राजपूत यांनी आपल्या मातीतले खेळ ही संकल्पना घेऊन आपल्या सर्व महिला सभासदा साठी कबड्डी खो खो लांब उडी क्रिकेट दोरी उडी रस्सीखेच धावणे पोत्यातील उड्या लिंबू चमचा अशा विविध खेळांचे आयोजन टिकी टाका टर्फ मंगळवार पेठ कोल्हापूर येथे केले होते आजच्या मोबाईलच्या युगात धावपळीच्या जीवनात खेळाचे महत्व किती गरजेचे आहे हा संदेश देण्यासाठी हा उपक्रम कृष्णा फाउंडेशनच्या सर्व आयोजक टीमने राबवला यामध्ये लहान मुले व कृष्णा फाउंडेशन मधील सर्व सभासदांनी अतिशय उत्साहाने सहभाग नोंदवून खेळांचा मनमुराद आनंद लुटला लहान गटात धावण्याच्या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक आराध्या सुतार तर द्वितीय आणि तृतीय क्रमांक ऋत्वेद हळबे व स्वरा भांबुरे यांना मिळाला तसेच दोरी उड्या स्पर्धेमध्ये आरोही शर्मा लिंबू चमचे स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक आराध्या साळुंखे तर द्वितीय क्रमांक सही जाधव आणि तृतीय क्रमांक स्वरा भांबुरे यांना मिळाले महिला गटामध्ये चाळीस वर्षाच्या पुढील महिलांमध्ये धावण्याच्या स्पर्धेत प्रथम क्रमांक विना सरनाईक द्वितीय गौरी जाधव तर तृतीय विना प्रकाश चाळीस वर्षाच्या आतील महिलांच्या मध्ये प्रथम क्रमांक दिपाली सुतार तर द्वितीय आणि तृतीय क्रमांक मेघा उलपे अनिता गडकरी यांनी पटकावला लिंबू चमचा मध्ये अनुक्रमे नविता नाईक बिना प्रकाश नैना शेळके यांनी बाजी मारली तसेच लहान गटामध्ये पुष्टी धावडा निशा भांबुरे कशिष वाधवा. याने नंबर मारले चाळीस वयाच्या आतील महिलांची लांब उडी स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक दिपाली सुतार तर द्वितीय क्रमांक अस्मिता चव्हाण तृतीय क्रमांक गीतांजली शर्मा यांना क्रिकेट ग्रुप स्पर्धेमध्ये सिंहगड संघ तर रस्सीखेच मध्ये पन्हाळा गड संघ आणि कबड्डी मध्ये पन्हाळा गड संघ यांनी बाजी मारली या स्पर्धेसाठी पर्यवेक्षक म्हणून उमेश चौगुले यांचे मोलाचे सहकार्य लाभले यामध्ये बक्षीस स्वरूपात ट्रॉफी व धान्याचे देखील वाटप करण्यात आले.
कृष्णा कला क्रीडा सांस्कृतिक आणि सामाजिक संस्था कोल्हापूर यांचा अनोखा उपक्रम
|