विशेष बातम्या

घरकुलच्या मागणीसाठी इचलकरंजी महापालिकेसमोर चूल मांडून अनोखे आंदोलन

A unique movement by placing a hearth in front of the Ichalkaranji Municipal Corporation for the demand of Gharkul


By nisha patil - 7/6/2023 4:44:06 PM
Share This News:




इचलकरंजी : प्रतिनिधी  करवीर कामगार संघाच्या वतीने पंतप्रधान घरकुल योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी  इचलकरंजी महापालिकेसमोर मंगळवारी चूल मांडून अनोखे आंदोलन करण्यात आले.यावेळी आंदोलकांनी शासन व महापालिका प्रशासना विरोधात जोरदार घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला.
  करवीर कामगार संघाच्या वतीने इचलकरंजी महापालिकेच्या दारात ज्यांना घरकुल नाही अशांना ती मिळावीत या मागणीसाठी गेल्या काही दिवसांपासून बेमुदत ठिय्या आंदोलन सुरु केले आहे.तरीही या आंदोलनाची साधी दखलही महापालिका प्रशासनाने घेतली नसल्याचा आरोप करवीर कामगार संघाचे हणमंत लोहार यांनी केला आहे.प्रशासनाच्या या ढिसाळ कारभाराचा निषेध म्हणून मंगळवारी आंदोलकांनी महापालिकेच्या प्रवेशव्दारासमोरच चूल पेटवून अनोखे आंदोलन केले.यावेळी कामगार नेते 
हणमंत लोहार यांनी घरकुल योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी महापालिका प्रशासनाने तातडीने कार्यवाही करावी, अन्यथा आणखी तीव्र आंदोलन छेडू ,असा इशारा दिला.
या आंदोलनामध्ये महेश लोहार , शिवाजी जाधव , दादू मगदूम ,
दादासाहेब जगदाळे ,वर्षा जाधव , हुसेनबी रोया ,मीना भोरे  ,जन्नत मुल्ला , श्री. मगदूम  , श्री.चौगुले यांच्यासह कामगार व त्यांचे कुटुंबीय मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.


घरकुलच्या मागणीसाठी इचलकरंजी महापालिकेसमोर चूल मांडून अनोखे आंदोलन