बातम्या

मांताशा हुसैनच्या जिद्दीची अनोखी कहाणी

A unique story of Mantasha Hussains perseverance


By nisha patil - 6/6/2023 5:34:18 PM
Share This News:



तारा न्यूज वेब टीम आपल्या अपंगत्वावर मात करत मिरा रोडच्या मांताशा हुसैन या मुलीने दहावीत 81 टक्के मार्क मिळवून एक आदर्श निर्माण केला आहे. दिव्यांगावर हताश होऊन अर्धवट शिक्षण सोडलेल्या आपल्याच मित्रांना तिने जिद्दीने यश कसं मिळवायचं याचा आदर्शच समोर ठेवला आहे. 
मांताशा इरफान हुसैन हिच्या 90 टक्के शरीराने तिला साथ न देण्याचं जन्मतःच ठरवलं होतं, मात्र तिने घरच्यांच्या आणि शिक्षकांच्या मदतीने यशाचं शिखर गाठलं आहे. तिने कधीच हार मानली नाही आणि दहावीत 81 टक्के गुणांनी उत्तीर्ण होऊन समाजासमोर आणि दिव्यांग मुलांसमोर एक आदर्शच उभा केला आहे. मिरा रोडच्या आश्मी प्लाझा या सोसायटीत मांताशा आपल्या आई-वडिलांसह राहते. मांताशा जन्मत: दिव्यांग आहे, तिला सी.पी. म्हणजेच, स्पस्टिक क्वाड्रिप्लेजिक सेरेब्रल पाल्सी हा आजार जन्मतःच होता. 
या आजारात तिचे दोन्ही हात आणि पाय काम करत नाही, तिचे 90 टक्के शरीर अंपग आहे. दिव्यांग असूनही मांताशा लहानपणापासून फारच सकारात्मक आहे. तिला एका ठिकाणाहून दुसरीकडे जाण्यासाठी घरच्यांची मदत घ्यावी लागते. आठवीपर्यंतचं शिक्षण तिने मिरा रोडच्या सेंट अँन्थोनी शाळेतून घेतलं. आठवीनंतर दुसऱ्या मजल्यावर वर्ग गेल्याने तिने घरुनच शिक्षण घेण्याच ठरवलं.
मांताशाचे वडील तिला बाईकवर बसवून शाळेत सोडायचे. शाळेत तिच्यासाठी स्वतंत्र अशी खुर्ची बनवण्यात आली होती, तिच्या घरी देखील तिला स्वतंत्र खुर्ची बनवण्यात आली आहे. पुढे अभिनव कॉलेजमधून तिने दहावीचा प्राइव्हेट फॉर्म भरुन राईटरच्या मदतीने दहावीचा पेपर दिला आणि तिला घवघवीत यश मिळालं. तिच्या या यशाने आई-वडिलांसह ती स्वत:  घडवायचं आहे.


मांताशा हुसैनच्या जिद्दीची अनोखी कहाणी