मिरज तालुक्यातील एरंडोली येथे पत्नीने केला पतीचा निर्घृण खून
By nisha patil - 5/25/2023 6:18:12 PM
Share This News:
कोल्हापूर प्रतिनिधी मिरज तालुक्यातील एरंडोली येथील आरग स्टेशन रोडवर फॉरेस्टच्या जागेवर असलेल्या पारधीवस्तीत पत्नीने पतीचा धारदार शास्त्राने वार करून खून केला. पती सुभेदार आंनद काळे असे ठार झालेल्याच नाव आहे . पत्नी रंजीता काळे हि फरार झाली असून या घटनेमुळे मिरज तालुक्यात खळबळ माजली आहे. सुभेदार काळे आणि त्याची पत्नी रंजीता हे दोघेजण आरग स्टेशन रोडवर पारडीवस्तीत राहतात. सुभेदार याला दारूचे व्यसन असल्याने त्यांच्यात रोज भांडणे व्हायची. शिवीगाळ आणि हाणामारी हा प्रकार रोज घडत होता. सुभेदार हा दारू पिऊन पत्नी रंजिताला लवकर स्वयंपाक करत नाही म्हणून शिवीगाळ तसेच मारहाण करू लागला. सततची मारहाण आणि शिवीगाळ याला रंजीताने चिडून जावून शिकारीसाठी वापरण्यात येणार्या धारदार हत्याराने सुभेदार याच्या छातीत व पोटात वार करून त्याचा खून केला. सुभेदार याचा जागीच मृत्यू झाला. सुभेदार याची पत्नी हल्लेखोर रंजिता काळे तेथून फरार झाली आहे. घटनेची नोंद मिरज ग्रामीण पोलिसात झाली आहे.
मिरज तालुक्यातील एरंडोली येथे पत्नीने केला पतीचा निर्घृण खूनspeednewslive24
|