बातम्या
कोल्हापुरात वाहतूक शाखेच्या महिला कॉन्स्टेबलने चोरट्याला पकडून दिले…
By nisha patil - 11/1/2024 6:28:23 PM
Share This News:
कोल्हापुरात वाहतूक शाखेच्या महिला कॉन्स्टेबलने चोरट्याला पकडून दिले…
कोल्हापूर : स्टेशन रोडवर व्हिनस कॉर्नर परिसरातील प्रकार. दुचाकी चोरून पळून जाणाऱ्या चोरट्यास शहर वाहतूक नियंत्रण शाखेच्या महिला पोलीस स्नेहल कॉन्स्टेबल कोरगांवकर यांनी व्हिनस कॉर्नर येथे अडवून विचारपूस केली. दुचाकीला नंबरप्लेट, कागदपत्रे इतकेत नव्हे तर लायसन्सही नव्हते.कोरगावकर यांनी शाहूपुरी पोलीसांना बोलवून या चोरट्यास पोलीसांच्या ताब्यात दिले. पोलीसांनी कसून चौकशी केल्यानंतर त्याने शहरातून चोरलेल्या तीन दुचाकींची कबुली दिली. आशिष उर्फ विजय रामरोहिडा असे संशयीताचे नाव आहे.
व्हिनस कॉर्नर येथे वाहतूक शाखेच्या महिला कॉन्स्टेबल स्नेहल कोरगावकर या ड्युटी करीत असताना त्यांनी विना नंबरप्लेटच्या दुचाकीस्वारास थांबवून विचारपूस केल्यानंतर तो उडवा उडवीची उत्तरे देऊ लागला. त्याच्यावर संशय आल्यानंतर कोरगावकर यांनी त्यास शाहूपुरी पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक संदीप जाधव यांच्या ताब्यात दिले. पोलीसांनी त्याच्याकडे कसून चौकशी केल्यानंतर त्याने बस स्थानक परिसरातून चोरलेल्या एक लाख वीस हजार रुपयांच्या तीन दुचाकी काढून दिल्या आहेत. पोलीस निरीक्षक अजयकुमार सिंदकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक संदीप जाधव, मिलींद बांगर, विकास चौगुले, शुभम संकपाळ, रवि आंबेकर यांनी कारवाई केली. पुढील तपास सहायक फौजदार शंकर कोळी करीत आहेत.
कोल्हापुरात वाहतूक शाखेच्या महिला कॉन्स्टेबलने चोरट्याला पकडून दिले…
|