बातम्या

विवाहबाह्य संबंधांसाठी एका महिलेने आपल्या पोटचा मुलाची केली हत्या

A woman killed her unborn child for having an extramarital affair


By nisha patil - 10/1/2024 5:09:15 PM
Share This News:



विवाहबाह्य संबंधांसाठी एका महिलेने आपल्या पोटचा मुलाची केली हत्या 

 आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या जगात नाव कमावणारी कंपनीची सीईओ 39 वर्षीय सूचना सेठ  सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे. आपल्या पोटच्या मुलाचीच हत्या करुन या निर्दयी आईनं मातृत्वाला काळीमा फासला आहे. चार वर्षांच्या मुलाची हत्या करून गोव्याहून बंगळुरूला परतत असताना कर्नाटकातील चित्रदुर्गाजवळ तिला अटक करण्यात आली. कर्नाटक पोलिसांनी कारमध्ये ठेवलेल्या बॅगेतून मुलाचा मृतदेहही जप्त केला आहे. पोलिसांनी चिमुकल्याचा मृतदेह ताब्यात घेऊन तो पोस्टमॉर्टमसाठी पाठवला. पोस्टमॉर्टम रिपोर्टमधून याप्रकरणी अनेक धक्कादायक खुलासे झाले आहेत. 

हिरयुर येथील शासकीय रुग्णालयाचे प्रभारी डॉक्टर कुमार नाईक यांनी मृतदेहाचं शवविच्छेदन केलं. पोस्टमॉर्टममध्ये अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. सूचना सेठनं मुलाच्या हत्येसाठी कुठल्यातरी गोष्टीचा वापर करण्यात आल्याचं पोस्टमॉर्टम रिपोर्टमधून समोर आलं आहे. उशी किंवा टॉवेलच्या मदतीनं चिमुकल्याचा गळा घोटून हत्या करण्यात आल्याचं पोस्टमॉर्टम रिपोर्टमधून समोर आलं आहे.  

पोस्टमॉर्टमच्या 36 तासांपूर्वीच मुलाचा मृत्यू झाल्याचं पोस्टमॉर्टम रिपोर्टमधून स्पष्ट झालं आहे. तसेच, मुलाच्या शरीरावर कुठेच रक्त्याचे डाग आढळून आलेले नाहीत. मुलाचा मृत्यू गळा घोटल्यामुळे झाल्याचं डॉक्टरांनी स्पष्ट केलं. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सूचना सेठ मूळची पश्चिम बंगालची. ती बंगळुरूमध्ये आली होती. तिथे तिचं एका व्यक्तीवर प्रेम जडलं आणि दोघांनी 2010 मध्ये लग्न केलं. पण, लग्नानंतर दोघांमध्ये खूप भांडणं व्हायची. यानंतर त्यांनी घटस्फोटासाठी अर्ज केला आणि रविवारी वडिलांना मुलाला भेटण्याची परवानगी देण्यात आली. रविवारी 7 जानेवारी रोजी वडिलांनी आपल्या मुलाला व्हिडीओ कॉल देखील केला होता. तो इंडोनेशियामध्ये होता आणि तिला प्रत्यक्ष भेटायला येऊ शकला नाही. दुसऱ्या दिवशी म्हणजेच, 8 जानेवारीला गोव्यातील कँडोलिम भागातील सोल बनियन ग्रँड हॉटेलच्या खोलीत मुलाची हत्या करण्यात आली. पतीच्या वकिलानं दावा केला की, पोलिसांनी तिला अटक केल्यानंतर सूचना सेठशी बोलले तेव्हा ती मानसिकदृष्ट्या निरोगी आणि सामान्य दिसत होती.


विवाहबाह्य संबंधांसाठी एका महिलेने आपल्या पोटचा मुलाची केली हत्या