बातम्या
उल्कावर्षावाचा अद्भुत नजारा शुक्रवारी रात्री पाहायला मिळणार
By Administrator - 11/12/2024 4:52:29 PM
Share This News:
उल्कावर्षावाचा अद्भुत नजारा शुक्रवारी रात्री पाहायला मिळणार
या वर्षातील सर्वात मोठ्या उल्कावर्षांपैकी एक असलेला जेमिनिड्स उल्कावर्षाव येत्या १३ डिसेंबरच्या रात्री पाहण्याचा आनंद नागरिकांना मिळणार आहे. प्रति तास अंदाजे १२० उल्का दिसण्याची शक्यता असून, हा खगोलीय नजारा खूपच थक्क करणारा असेल.
शिवाजी विद्यापीठाच्या पन्हाळा येथील अंतराळ संशोधन केंद्राने उल्कावर्षाव निरीक्षणासाठी रात्री ८ वाजल्यानंतर खुल्या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. पन्हाळा हे निरीक्षणासाठी उत्तम ठिकाण आहे कारण तेथे प्रकाशप्रदूषण कमी असून आकाश स्पष्ट दिसते. या कार्यक्रमाला सर्व नागरिक, शाळा-महाविद्यालयातील विद्यार्थी यांनी सहभागी होण्याचे आवाहन केंद्राचे समन्वयक डॉ. राजीव व्हटकर यांनी केले आहे.
उल्कावर्षाचे निरीक्षण कसे करावे?
शहराच्या प्रकाशापासून दूर, अंधाऱ्या ठिकाणी जा.
आरामदायक आसन घ्या आणि डोळ्यांना अंधारात सवय होऊ द्या.
आकाशाकडे लक्ष ठेवा.
उल्का दिसण्यासाठी थोडा वेळ लागू शकतो, संयम ठेवा.
यावर्षी चंद्रप्रकाशामुळे उल्कावर्षावावर काहीसा प्रभाव पडू शकतो, मात्र आकाश निरीक्षणाचा अनुभव अविस्मरणीय असेल. त्यामुळे खगोलप्रेमींनी हा अद्भुत नजारा चुकवू नये!
उल्कावर्षावाचा अद्भुत नजारा शुक्रवारी रात्री पाहायला मिळणार
|