बातम्या

विवेकानंद मध्ये IQAC आणि इंग्रजी विभागाच्या संयुक्त विद्यमाने प्रशासकीय कर्मचाऱ्यांची कार्यशाळा संपन्न

A workshop for administrative staff was held in Vivekananda in association with IQAC and English department


By nisha patil - 10/7/2024 9:39:16 PM
Share This News:



विवेकानंद कॉलेजमध्ये IQAC आणि इंग्रजी विभागाच्या संयुक्त विद्यमाने प्रशासकीय कर्मचाऱ्यांसाठी “नॅकला सामोरे जाताना” या विषयावर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.  अध्यक्षस्थानी गणित विभागप्रमुख प्रा.एस.पी.थोरात हे होते.

 या कार्यशाळेसाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून शिवाजी विद्यापीठ,  कोल्हापूर येथील सॉफ्ट स्कील ट्रेनर डॉ.वैशाली शिंदे ह्या उपस्थित होत्या. त्यांनी पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनद्वारे सर्वांना मार्गदर्शन करताना आपण आपल्या जीवनात वाडवडिलांकडून कसे वागावे, कसे बोलावे हे शिकत आलो आहेच. परंतु अलिकडच्या धकाधकीच्या तणावयुक्त परिस्थितीमध्ये संवाद कौशल्ये व शिष्टाचार याचे महत्व फार आहे. संवाद साधताना शाब्दीक, अशाब्दीक, हावभावातून, आपल्या नजरेतून तसेच बोलण्याच्या सूरातून आपण व्यक्त होत असतो. कोणता प्रसंग आहे आपण कसे व्यक्त झालो पाहिजे याबद्दल अतिशय बहुमोल असे मार्गदर्शन केले. आपण घरामध्ये वावरताना तसेच ऑफिसमध्ये काम करीत असताना कोणती पथ्ये पाळली पाहिजेत. ज्याठिकाणी आपण वावरत असू तेथील लिखित तसेच अलिखित सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन सर्वांनी केले पाहिजे. प्रत्येकाने आपण जिथं काम करतो त्यासंस्थेबद्दल प्रेम, निष्ठा बाळगली पाहिजे. संस्थेमध्ये वावरत असताना त्याठिकाणी असलेली सर्व आचारसंहिता पाळली पाहिजे. यामध्ये आपला ड्रेसकोड, ओळखपत्र, शिस्त यांसारख्या गोष्टींचा समावेश असतो. सर्वांनी इतर कौशल्ये विकसित करणे आवश्यक आहे. त्यासाठी सामान्य व्यवहार ज्ञान, समयसूचकता, हजरजबाबीपणा हे गुण अवगत असणे आवश्यक आहे. आपण ज्या ठिकाणी काम करतो तेथे काम करीत असताना सकारात्मकता, सामाजिक कौशल्ये, संघभावना असणे फार महत्वाचे आहे. नेतृत्व करणाऱ्यांनीही अहंमभाव न बाळगता संघर्ष टाळून वाटावाघाटीद्वारे प्रश्न सोडवावेत. यानंतर प्रश्नोतराव्दारे संवाद साधून शंका निरसन करण्यात आले. 

 

कार्यक्रमाची सुरुवात रोपास पाणी घालून झाली. त्यानंतर संस्था प्रार्थना झाली. त्यानंतर कॉलेजमधील IQAC विभागाच्या समन्वयक डॉ.श्रृती जोशी यांनी प्रास्ताविक व स्वागत करताना महाविद्यालयातील प्रशासकीय वर्ग हा देखील एक महत्वाचा अविभाज्य घटक असल्याचे नमूद केले. प्रशासकीय सेवकांसाठी महाविद्यालय विविध उपक्रमांचे आयोजन करत असते. महाविद्यालय नॅक च्या 4थ्या सायकलला सामोरे जात असून पिअर टीम प्रत्यक्ष भेटीवेळी करावी लागणारी तयारी यांसाठी या कार्यशाळेचे आयोजन केले असल्याचे सांगितले. कार्यक्रमात पुढे इंग्रजी विभागाच्या प्रमुख डॉ.कविता तिवडे यांनी पाहुण्यांचा परिचय करुन दिला.

 अध्यक्षीय भाषणात बोलताना  प्रा.एस.पी.थोरात म्हणाले, कॉलेज हे एक कुटूंब समजून काम करा. कोणत्याही कामाचा तणाव न घेता जीवनात सकारात्मक दृष्टीकोन ठेवून वागा.  महाविद्यालयाच्या विकासात प्रशासकीय कर्मचाऱ्यांचा मोठा वाटा आहे. या कार्यशाळेचे आयोजन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर.आर. कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली  IQAC व इंग्रजी विभागाने केले होते.  शेवटी महाविद्यालयाचे रजिस्ट्रार श्री.आर.बी.जोग यांनी आभार मानले. यावेळी सहाय्यक ग्रंथपाल श्री.हितेंद्र साळुंखे, अधीक्षक श्री एस के धनवडे, प्रा माधुरी पवार, प्रा.कोमल व्होनखंडे व सर्व प्रशासकीय सेवक बहुसंख्येने उपस्थित होते. सुत्रसंचालन प्रा सुप्रिया पाटील यानी केले.


विवेकानंद मध्ये IQAC आणि इंग्रजी विभागाच्या संयुक्त विद्यमाने प्रशासकीय कर्मचाऱ्यांची कार्यशाळा संपन्न