बातम्या
होळीचा रंग नको म्हणणाऱ्या तरुणाची हत्या!
By nisha patil - 3/14/2025 3:57:00 PM
Share This News:
होळीचा रंग नको म्हणणाऱ्या तरुणाची हत्या!
धक्कादायक प्रकार आला समोर
राजस्थानच्या दौसा जिल्ह्यात होळीचा रंग लावण्यास नकार दिल्याच्या कारणावरून २५ वर्षीय तरुणाची गळा आवळून हत्या करण्यात आली. गुरुवारी रात्री हंसराज नावाच्या तरुणाला जबरदस्तीने रंग लावण्याचा प्रयत्न झाला. मात्र, त्याने विरोध केला असता आरोपी अशोक, बबलू आणि कालूराम यांनी त्याच्यावर हल्ला केला. मारहाणीनंतर गळा आवळल्याने हंसराजचा मृत्यू झाला. आरोपी फरार असून पोलिसांनी त्यांचा शोध सुरू केला आहे.
होळीचा रंग नको म्हणणाऱ्या तरुणाची हत्या!
|