बातम्या

पोलिस ठाण्यासमोरच भरदिवसा कोयता, कटर, ब्लेडने तरुणाच्या पाठीत वार; कोल्हापुरातील धक्कादायक प्रकार

A young man was stabbed in the back with a knife cutter blade in broad daylight in front of the police station


By nisha patil - 6/19/2023 5:02:23 PM
Share This News:



कोल्हापूर प्रतिनिधी भरदिवसा थेट पोलिस ठाण्यासमोर तरुणावर कोयता, कटर, ब्लेडने तरुणाच्या पाठीत वार केल्याची धक्कादायक घटना कोल्हापूर जिल्ह्यातील  इचलकरंजी शहरात घडली. आजीला मारहाण केल्याची तक्रार देण्यासाठी जात असलेल्या तरुणावर शिवाजीनगर पोलिस ठाण्यासमोरच प्राणघातक हल्ला करण्यात आला. अभिषेक बजरंग खांडेकर हा गंभीर जखमी झाला आहे. विमल प्रकाश पाटील  याही जखमी झाल्या आहेत. गंभीर जखमी झालेल्या अभिषेकवर इचलकरंजीमधील आयजीएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी रावसाहेब गोसावी, उमाजी गोसावी आणि अजय जुवे  यासह चौघांवर शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.रविवारी दुपारच्या सुमारास शिवाजीनगर पोलिस ठाण्यासमोर किरकोळ कारणावरून संशयित रावसाहेब गोसावी व जखमी विमल पाटील यांच्यात वाद झाला. या वादात रावसाहेब याने वृध्द विमल पाटील यांना मारहाण केली. आजीला मारहाण केल्याची तक्रार देण्यासाठी अभिषेक खांडेकर हे शिवाजी नगर पोलिस ठाण्यात जात होते. याचवेळी रावसाहेब गोसावी पोलिस ठाण्याच्या बाहेरच्या मार्गावर खांडेकर यांच्या अंगावर धावून गेला आणि मारहाण करण्यास सुरुवात केली. रावसाहेबांसोबत आलेल्या अजय, उमाजीसह तिघांनी धारदार शस्त्रासह खांडेकर यांच्यावर हल्ला चढवला. तिघांनी कोयता, कटर, ब्लेडने खांडेकर यांच्या पाठीवर वार केले. आसपासच्या नागरिकांची गर्दी जमताच संशयित पसार झाले.


पोलिस ठाण्यासमोरच भरदिवसा कोयता, कटर, ब्लेडने तरुणाच्या पाठीत वार; कोल्हापुरातील धक्कादायक प्रकार