बातम्या
तोरस्कर वाडी धबधब्यातून वाहून गेला तरुण
By nisha patil - 2/10/2023 8:13:12 PM
Share This News:
राधानगरी तालुक्यातील मौ. आडोली पैकी तोरस्कर वाडी धबधबा येथे गारगोटी येथील प्रणव कलगुटकी हा काल दुपारी ३:00वाजता आपल्या ३मित्रांसमवेत धबधबा पाहण्यासाठी गेला होता प्रचंड पाऊस होता तसेच पाण्याचा प्रवाहही जास्त होता, त्यामुळे पाण्यामध्ये गेलेले चोघांपैकी प्रणव हा पाण्यात बुडला त्याचे बाकीचे ३ मित्र पाण्याचे प्रवाहातून बाहेर आले ,कालपासून प्रणवचे शोध मोहीम सुरु आहे
राधानगरी तालुक्यातील मौ. आडोली पैकी तोरस्कर वाडी धबधबा हा धोकादायक असल्यामुळे पर्यटनासाठी त्याचेवर बंदी घातली आहे तरी देखील पर्यटक तो धबधबा पाहणेसाठी जातात काल गारगोटी येथील प्रणव कलगुटकी मित्रांसमवेत पर्यटनासाठी गेला असता तो दुपारी३:00 वाजता पाण्यात बुडाला असून त्याचे बाकीचे ३ मित्र पाण्याचे प्रवाहातून बाहेर आले , अद्याप त्याचा मुतदेह सापडला नसलेने शोध मोहीम सुरु आहे .त्याचा काल पण शोध सुरु होता परत आज सकाळ पासून त्याचा शोध घेण्यात येत आहे.
अति दाबामुळे व धबधब्यातून पडणाऱ्या पाण्यामुळे शोध मोहीम करण्यास अडचण येत आहे तरी देखील या पाण्यामध्ये आपत्ती व्यवस्थापना मधील के .डी .आर. एफ. चे जवान शोध घेण्याचे काम चालू आहे.
तोरस्कर वाडी धबधब्यातून वाहून गेला तरुण
|