पंचगंगा नदी घाटावर पोहायला गेलेला युवक बुडाला; अग्निशमन दलाकडून शोधकार्य सुरू
By nisha patil -
Share This News:
कोल्हापूर: प्रतिनिधी मित्रांसोबत पोहायला गेलेल्या युवकाचा पंचगंगा नदीत बुडून मृत्यू झाला. वीस वर्षीय पृथ्वीराज चंद्रकांत गवळी (रा. गवळी गल्ली, शनिवार पेठ) असे या दुर्दैवी युवकाचे नाव असून अग्निशमन दलाच्या वतीने रात्री उशिरापर्यंत पंचगंगा नदीत मृतदेह शोधण्याचे कार्य सुरू होतं.
याबाबतची अधिक माहिती अशी, डिप्लोमाच्या पहिल्या वर्षात शिकत असलेला पृथ्वीराज आज सायंकाळी मित्रांसोबत पंचगंगा नदीमध्ये पोहायला गेला होता. मित्रांसोबत पोहताना पृथ्वीराजला दम लागला, त्याच्या नाकातोंडात पाणी गेल्याने तो बुडु लागला. नदीमध्ये खोल पाणी असल्यामुळे तो बुडु लागला, यावेळी त्याच्या मित्रानी तिथून पळ काढला. नदी काठावर उपस्थित असलेल्या नागरिकांनी आरडाओरोड केली, उपस्थित नागरिकांनी याबाबतची माहिती महापालिकेच्या अग्निशमन दलाला कळवली, टिंबर मार्केट, कावळा नाका, फुलेवाडी, महापालिकेतील अग्निशमन दलाचे जवान तात्काळ पंचगंगा नदी घाटावर दाखल झाले, अग्निशमन दलाच्या रेस्क्यू फोर्स मधील जवानांनी बोटीच्या सहाय्याने पाण्यात बुडालेला शोधण्याची मोहीम हाती घेतली. रात्री उशिरापर्यंत मृतदेह शोधण्याचे काम सुरू होते.
दरम्यान, नदीत बुडालेला पृथ्वीराज एकुलता एक असल्याने त्याच्या कुटुंबीयांनी पंचगंगा नदी घाटावर फोडलेल्या टाहोमुळ अनेकांचे डोळे पानावले. पृथ्वीराज याच्या पश्चात्य आई-वडील असा परिवार आहे.
पंचगंगा नदी घाटावर पोहायला गेलेला युवक बुडाला; अग्निशमन दलाकडून शोधकार्य सुरू
|