बातम्या

मित्रासोबत आठवडाभरापूर्वी पार्टीला गेलेल्या युवकाचा तीक्ष्ण हत्यारांनी वार करून केला खून

A youth who went to a party with a friend a week ago was stabbed to death with sharp weapons


By nisha patil - 12/9/2023 7:39:13 PM
Share This News:



मित्रासोबत आठवडाभरापूर्वी पार्टीला गेलेल्या युवकाचा तीक्ष्ण हत्यारांनी वार करून केला खून

आठवड्याभरापूर्वी बायकोनं नवऱ्याची मित्रांची पार्टी असल्याने घरातून स्वयंपाक बनवून दिला. मात्र त्यानंतर जवळसपास आठवडाभर नवरा घरी परतलाच नाही. बायकोने पोलिसांत नवरा बेपत्ता झाल्याची तक्रार दिली. त्यानंतर काही दिवसांनी संबंधित महिलेच्या नवऱ्याचा खून झाल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. नाशिक शहरातील ही धक्कादायक घटना असून मित्रांनीच पार्टीच्या दिवशी युवकाचा खून केल्याचा पोलिसांचा संशय आहे. 

नाशिक शहरात गुन्हेगारी काही नवीन नाही. मागील काही दिवसांत किरकोळ गुन्ह्याच्या घटना सोडल्या तर नाशिक शांत असल्याचे दिसून येत होते. मात्र अशातच शहरातील जेलरोड भागातून खुनाची घटना समोर आल्याने खळबळ उडाली आहे. मित्रासोबत आठवडाभरापूर्वी पार्टीला गेलेल्या युवकाचा तीक्ष्ण हत्यारांनी वार करून खून केल्याचा धक्कादायक प्रकार नाशिक शहरात उघडकीस आला आहे. आठवडाभरानंतर शहरातील नाशिक रोड परिसरातील पंचक शिवारात निर्जन स्थळी दुपारी आढळलेल्या मृतदेहाचा पंचनामा व शवविच्छेदन झाल्यानंतर निघून खून केल्याचे समोर आले आहे पोलीस तपासात हा युवक ज्ञानेश्वर शिवाजी गायकवाड असल्याचे समोर आले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील जेलरोड भागातील पंचक गावातील ज्ञानेश्वर गायकवाड हा युवक 3 सप्टेंबर रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास मित्रा सोबत पार्टी करण्यासाठी घरून जेवण बनवून दुचाकीवर गेला, मात्र पुन्हा घरी आला नाही. याबाबत पत्नी, वडील व शेजारी यांनी त्याचा शोध घेतला असता तो मिळून न आल्याने पत्नी साधना ज्ञानेश्वर गायकवाड यांनी नाशिकरोड पोलीस ठाण्यात हरवल्याबाबत तक्रार दिली होती. दरम्यान सोमवारी गावातील सोमनाथ बोराडे हे आपल्या गायी-म्हशी घेऊन पंचक येथील गोदावरी नदी किनारी गेले असता त्यांना उग्र वास येऊ लागल्याने गावकऱ्यांच्या मदत घेतली. तेव्हा त्यांना धक्काच बसला. त्यांनी तात्काळ नाशिक रोड पोलिसांना याबाबत कळवले. पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली असता मृतदेह पालापाचोळ्याने झाकून ठेवल्याचे लक्षात आले. 

पोलिसांकडून संशयित ताब्यात 
दरम्यान पोलिसांनी मृतदेहाची पाहणी केली असता त्याच्या छातीवर खोलवर जखमा दिसून आले. चेहऱ्यावर सिमेंट टाकलेले आढळून आले.  मृतदेह सात ते आठ दिवसापासून टाकून दिला असल्याने तो कुजलेल्या अवस्थेत मिळून आला. पोलिसांनी तपास केला असता तो मृतदेह ज्ञानेश्वर गायकवाड याचा असल्याचे नातेवाईकांनी ओळखले. ज्ञानेश्वर शिवाजी गायकवाड हा कधी मोजमजुरी तर कधी भांडे विक्रीचा व्यवसाय करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत होता. त्याच्या पश्चात वडील पत्नी, एक लहान मूल आहे. त्याचा खून कोणी व का केला याचा शोध पोलीस घेत आहेत. याप्रकरणी नाशिकरोड पोलिसांनी काही संशयितांना ताब्यात घेतले असून त्यांची कसून चौकशी केली जात आहे.


मित्रासोबत आठवडाभरापूर्वी पार्टीला गेलेल्या युवकाचा तीक्ष्ण हत्यारांनी वार करून केला खून