बातम्या

'आप' हे नेतृत्व निर्माण करणारे व्यासपीठ - मेहता

AAP is a platform that creates leadership  Mehta


By nisha patil - 1/29/2024 6:28:43 PM
Share This News:



'आप' हे नेतृत्व निर्माण करणारे व्यासपीठ - मेहता

पदग्रहण सोहळ्यात शंभर नियुक्तीपत्रांचे वाटप 

कोल्हापूर : "देशातील सत्ताधारी खरेपणाला घाबरतात. त्यामुळे चांगलं काम करणाऱ्या आप च्या नेत्यांना तुरुंगात डांबून ठेवण्याचे षडयंत्र सुरु आहे. आपने स्वच्छ प्रतिमेच्या व कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या लोकांना राजकारणात आणले. आज पदाधिकाऱ्यांना फक्त नियुक्ती पत्रे मिळाली नसून जबाबदारी मिळाली आहे." आप हे नेतृत्व तयार करणारे व्यासपीठ असल्याचे गौरवोदगार प्रसिद्ध सिनेअभिनेते व आप चे मुंबई प्रदेश चे सह-सचिव संदीप मेहता यांनी काढले.

शिवाजी उद्यमनगर येथील कोल्हापूर इंजिनिअरिंग असोसिएशन येथे आप शहर समितीच्या शंभर नवनियुक्त पदाधिकाऱ्यांच्या निवडी पार पडल्या. 

"शहरातील कष्टकरी लोकांसाठी आम आदमी पार्टी काम करत आहे. रिक्षाचालक, टिप्पर चालक, शालेय पोषण आहार बचत गट यांचे प्रश्न सोडवल्यामुळे हा घटक आप सोबत येत आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात सलाईनवर असलेल्या महापालिकेला उर्जीतवस्थेत नेण्याचे काम आपच्या माध्यमातून करण्याचा निर्धार नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी करावा" असे आवाहन आप चे प्रदेश संघटन सचिव संदीप देसाई यांनी केले.

शहराध्यक्ष उत्तम पाटील यांनी मार्गदर्शन केले. सूरज सुर्वे यांची उपाध्यक्ष, अभिजित कांबळे महासचिव, समीर लतीफ सचिव, दुष्यंत माने, विजय हेगडे, प्रसाद सुतार, पल्लवी पाटील यांची संघटकपदी, तर मोईन मोकाशी यांची युवा शहराध्यक्ष, संजय नलवडे रिक्षा संघटना अध्यक्ष, डॉ. उषा पाटील यांची डॉक्टर आघाडी अध्यक्षपदी निवड करण्यात आली.

यावेळी बचत गट आघाडी प्रमुख उषा वडर, क्रीडा आघाडी अध्यक्ष नाझील शेख, विद्यार्थी आघाडी अध्यक्ष सफवान काझी, टिप्पर चालक अध्यक्ष रणजित बुचडे यांच्यासह सह-संघटक, समिती सदस्यांना नियुक्तीपत्रे प्रदान करण्यात आली


'आप' हे नेतृत्व निर्माण करणारे व्यासपीठ - मेहता