बातम्या
सर्व आजारांपासून लांब ठेवतो हा ABC ज्युस,आजच करा तुमच्या आहारात समावेश
By nisha patil - 1/1/2024 8:14:41 AM
Share This News:
आरोग्याची काळजी घेण्यासाठी महत्त्वाचा असतो तो डाएट आणि व्यायाम. आजच्या धावपळीच्या जगात आपण आरोग्याची काळजी घेण्यात कमी पडतो. ज्यामुळे मग वेगवेगळ्या आरोग्याशी संबंधित आजारांचा सामना करावा लागतो.
व्यायाम आणि आहार या दोन्ही गोष्टी केल्यातर तुम्ही फीट राहू शकता. आम्ही तुम्हाला फिट राहण्याचा एक अतिशय सोपा मंत्र सांगणार आहोत. ज्यामुळे तुम्ही निरोगी राहाल. तुम्ही तुमच्या आहारात एबीसी ज्यूसचा समावेश करु शकतो. एबीसी ज्यूस म्हणजे सफरचंद, बीट आणि गाजर यांचा रस. या तीन गोष्टींचे मिश्रण करून तयार केलेल्या रसाला एबीसी ज्युस म्हणतात. चला मग त्याचे फायदे जाणून घेऊयात.
सफरचंद आणि बीटरूट तसेच गाजरमध्ये अव्हिटॅमिन ए, सी, ई, के आणि पोटॅशियम, लोह अशा अनेक प्रकारची खनिजेही आढळतात. याशिवाय यामध्ये फायबर देखील आढळते. त्यामुळेच हा ज्युस खूप फायदेशीर ठरतो.
व्हिटॅमिन सी आणि के आपली रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करतात. यांच्यामध्ये असलेल्या अँटी-ऑक्सिडेंट्समुळे हा ज्युस ऑक्सिडेटिव्ह नुकसान टाळण्यास मदत करतो.
पचनासाठी फायदेशीर
सफरचंद, बीटरूट आणि गाजर यामध्ये असलेले फायबर पचनासाठी फायदेशीर असते.
विषारी द्रव्य बाहेर काढण्यास मदत
सफरचंद, बीटरुट आणि गाजरचा रस प्यायल्याने शरीरातील विषारी द्रव्ये बाहेर काढण्यास मदत होते. बीटरूट आणि गाजरमध्ये डिटॉक्सिफायिंग गुणधर्म असतात. जे यकृतासाठी खूप फायदेशीर असते.
दृष्टीसाठी फायदेशीर
डोळ्यांच्या आरोग्यासाठी व्हिटॅमिन ए मदत करते. गाजर आणि बीट यात व्हिटॅमिन ए मोठ्या प्रमाणात आढळते, जे डोळे निरोगी ठेवण्यासाठी खूप फायदेशीर आहे. त्यामुळे तुम्ही जर हा ज्युस पित असाल तर तुमचे डोळे कमजोर होणार नाहीत.
त्वचेसाठी फायदेशीर
तुम्हाला जर निरोगी आणि चमकदार त्वचा हवी असेल तर तुम्ही तुमच्या आहारात या ज्युसचा समावेश केला पाहिजे. यामध्ये असलेले अँटी-ऑक्सिडंट्स तुमच्या त्वचेला फ्री रॅडिकल्सपासून वाचवतात.
सर्व आजारांपासून लांब ठेवतो हा ABC ज्युस,आजच करा तुमच्या आहारात समावेश
|