बातम्या

ऊस उत्पादनासाठी एआय तंत्रज्ञान आवश्यक – श्रीमती सुहासिनीदेवी घाटगे

AI technology is essential for sugarcane production


By nisha patil - 10/4/2025 2:47:15 PM
Share This News:



ऊस उत्पादनासाठी एआय तंत्रज्ञान आवश्यक – श्रीमती सुहासिनीदेवी घाटगे

कागल (प्रतिनिधी) –पारंपरिक पद्धतीने ऊस शेती करून अपेक्षित उत्पादन वाढत नाही. आधुनिक एआय (Artificial Intelligence) तंत्रज्ञानाच्या वापरामुळे उसाच्या उत्पादनात ५०% वाढ होत असल्याचे सिद्ध झाले आहे. त्यामुळे ऊस उत्पादन वाढीसाठी एआयचा वापर अपरिहार्य असल्याचे मत श्री छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षा व राज्य साखर संघाच्या संचालिका श्रीमती सुहासिनीदेवी घाटगे यांनी व्यक्त केले.

शाहू साखर कारखान्याच्या ऊस विकास योजनेंतर्गत सभासद शेतकऱ्यांना अनुदान चेकचे वाटप करण्यात आले. यावेळी सुरुवातीला राजर्षी शाहू महाराज व दिवंगत संस्थापक विक्रमसिंहराजे घाटगे यांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाला व्हाईस चेअरमन अमरसिंह घोरपडे, संचालक सचिन मगदूम व शिवाजीराव पाटील उपस्थित होते. शेती अधिकारी दिलीप जाधव यांनी स्वागत केले, तर कार्यकारी संचालक जितेंद्र चव्हाण यांनी प्रास्ताविक केले.

ऊस पिक परिसंवादाचा फायदा – घाटगे यांचे प्रतिपादन
स्व. राजेसाहेबांनी सुरू केलेल्या ऊस परिसंवाद योजनांमध्ये सहभागी होऊन शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञान समजले आणि ऊस उत्पादनात वाढ झाली, असे श्रीमती घाटगे यांनी सांगितले.


ऊस उत्पादनासाठी एआय तंत्रज्ञान आवश्यक – श्रीमती सुहासिनीदेवी घाटगे
Total Views: 27