बातम्या

ए टी फाउंडेशन चा उपक्रम- खेडेगावातील ५०१ मुलींचा फुटबॉल खेळामधे सहभाग

AT Foundation s initiative Participation of 501 village girls in football games


By nisha patil - 3/18/2024 9:42:22 PM
Share This News:



आशिया खंडामध्ये ए एफ सी वुमन्स  फुटबॉल दिन व सप्ताह साजरा करण्यात आला, याचे अवचित साधून प्रथमच एटी फाउंडेशन, या संस्थेने, गडहिंग्लज, आजरा व भुदरगड या तालुक्यातील धामणे, उत्तुर, काळमा बेलेवाडी, गडहिंग्लज, झुलपेवाडी, कडाळ, अर्दाळ,नूल, महागाव, मुत्नाळ, वडरगे हया अकरा खेडेगावातील मुलीं मध्ये फुटबॉल खेळाविषयी आवड व जागरूकता निर्माण करण्यासाठी विविध प्रकारचे फुटबॉल संबंधित मनोरंजक खेळ व सामूहिक उपक्रम राबविले.

पश्चिम महाराष्ट्रामधे पहिल्यांनदा इतक्या मोठ्या संख्येने खेडेगावातील मुलींनी फुटबॉल खेळा मधे सहभागी होवुन आनंद लुटला. 

गेल्या दहा दिवसापासून ए टी फाउंडेशन च्या टिमने सातत्याने खेडे गावांमध्ये जाऊन शाळांन मार्फत हा कार्यक्रम राबविला, या उपक्रमांमध्ये तब्बल 501 मुलींनी सहभाग घेतला असून सर्व उपक्रमांचा तपशील अखिल भारतीय फुटबॉल संघटना (एआय एफएफ) व आशियायी महाफुटबॉल संघटना (एफसी) यांना पाठवण्यात येणार आहे. 

माजी राष्ट्रीय फुटबॉल खेळाडू व एटी फाउंडेशन आणि अडॅप्ट फुटबॉल अकॅडमी च्या संस्थापिका, अंजू तुरंबेकर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षक चेतन सुतार, सहकारी अक्षय पावले व संबंधित गावातील फाउंडेशन च्या लीडर्स यांनी हा उपक्रम संबंधित गावांमध्ये राबविला. सर्व गावातील शाळेच्या मुक्याध्यापक व शिक्षकांचे बहुमूल्य सहकार्य लाभले. यापुढे या गावांमध्ये मुलींना फुटबॉल खेळण्यासाठी एटी फाउंडेशन आणि अडॅप्ट फुटबॉल अकॅडमी मार्फत योग्य मार्गदर्शन केले जाणार आहे.


ए टी फाउंडेशन चा उपक्रम- खेडेगावातील ५०१ मुलींचा फुटबॉल खेळामधे सहभाग