बातम्या

लेकीच्या लग्नात भावूक झाला आमिर खान

Aamir Khan got emotional at Lekki's wedding


By nisha patil - 11/1/2024 6:30:59 PM
Share This News:



लेकीच्या लग्नात भावूक झाला आमिर खान

बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता आमिर खान आणि त्याची एक्स वाईफ रीना दत्ता 
यांच्या मुलीचा लग्न सोहळा नुकताच पार पडला. आमिर आणि रीना यांची मुलगी आयरा खानने  उदयपूरमध्ये  नुपूर शिखरेसोबत लग्न केले. या जोडप्याच्या लग्नाच्या सेलिब्रेशनचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.  ख्रिश्चन पद्धतीने  आयरा आणि नुपूर यांनी लग्न केलं. आयरा आणि नुपूरच्या लग्नात आमिर भावूक झाला.  

 

आयरा खान आणि नुपूर शिखरे यांच्या लग्नासोहळ्या दरम्यान बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान हा रुमालाने अश्रू पुसताना दिसला.  सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, आयरा आणि नुपूर हे एकमेकांना रिंग घालत आहेत. त्याच वेळी आमिर खान हा नुपूर आणि आयरा यांना पाहून भावूक झाला आहे. आयरा खान आणि नुपूर शिखरे यांच्या लग्नासोहळ्याचा आणखी एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये आयरा,  जुनैद, नुपूर, नुपूरची आई, आमिर, रीना हे सर्वजण स्टेजवर एकमेकांना मिठी मारताना दिसत आहेत. या व्हिडीओमध्ये हे सर्व जण भावूक झालेले देखील दिसत आहेत.


लेकीच्या लग्नात भावूक झाला आमिर खान