बातम्या
आमिर खानचा जावई लग्नातील लूकमुळे झाला ट्रोल
By nisha patil - 4/1/2024 7:32:42 PM
Share This News:
आमिर खानचा जावई लग्नातील लूकमुळे झाला ट्रोल
अभिनेता आमिर खानची मुलगी आयरा खाननं नुपूर शिखरेसोबत लग्न केलं. आयरा आणि नुपूर यांनी काल रजिस्टर मॅरेज केलं आहे. त्यांच्या या रजिस्टर मॅरेजला त्यांच्या कुटुंबीयांनी आणि त्यांच्या मित्र-मैत्रिणींनी हजेरी लावली. आता आयरा आणि नुपूर यांच्या रजिस्टर मॅरेजचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या फोटो आणि व्हिडीओमधील नुपूरच्या लूकनं अनेकांचे लक्ष वेधले. अनेकजण नुपूरला त्याच्या लूकमुळे ट्रोल देखील करत आहेत. अशातच आता आयरा आणि नुपूर यांच्या रजिस्टर मॅरेजमधील एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये आयरा नुपूरला आंघोळ करायला सांगत आहे, असं दिसत आहे.
आमिर खानचा होणारा जावई टी-शर्ट आणि हाफ पॅन्टमध्ये लग्नाच्या वरातीत सामील झाला आहे. तो वेडिंग वेन्यूपर्यंत जॉगिंग करत आला. त्यानंतर तो त्याच लूकमध्ये स्टेजवर गेला आणि त्यानं रजिस्टर मॅरेजच्या पेपर्सवर सही केली.नुपूरला त्याच्या या लूकमुळे अनेकांनी ट्रोल केलं.
लग्नात असा लूक का केला आहे? असा प्रश्न अनेक नेटकऱ्यांनी विचारला.
आयरा नुपूरला म्हणाली, "आंघोळ करुन ये"
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडीओमध्ये आयराच्या हातात माईक दिसत आहे. रिना दत्ता, आमिर खान आणि आझाद देखील स्टेजवर दिसत आहेत. यावेळी आयरा नुपूरला म्हणते, 'नुपूर आता आंघोळ करणार आहे.'
आमिर खानचा जावई लग्नातील लूकमुळे झाला ट्रोल
|