बातम्या
कोल्हापूरला आयुक्त मिळण्यासाठी आपचे अंबाबाईला गाऱ्हाणं
By nisha patil - 12/8/2023 5:27:27 PM
Share This News:
कोल्हापूर महानगरपालिकेचे आयुक्त पद गेले दोन महिन्यांपासून रिक्त आहे. प्रभारी प्रशासक म्हणून जिल्हाधिकारी काम पाहत आहेत. परंतु कोणताही धोरणात्मक निर्णय घेण्यास अडचणी येत आहेत. परिणामी नवीन आयुक्ताची नेमणूक होई पर्यंत शहरवासियांना वाट बघावी लागणार आहे.कोल्हापूर महानगरपालिकेला कायमस्वरूपी आयुक्त मिळावा यासाठी आज आम आदमी पार्टीच्या वतीने श्री अंबाबाई देवीला साकडे घालून अभिनव आंदोलन करण्यात आले
येणारा आयुक्त आपल्याला मर्जीतला असावा यासाठी सध्या सत्ताधाऱ्यांमध्ये रस्सीखेच सुरु आहे. एखादा सीईओ केडरचा अधिकारी महापालिकेत आणून बसवण्याचा डाव आहे. सत्ताधाऱ्यांमध्ये निर्णय होत नसल्याने निर्णय प्रलंबित पडत पडत आहे.
बिन आयुक्त असलेल्या महापालिकेला कोणी वालीच नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे धोरणात्मक निर्णयांना खिळ बसत असल्याचं यावेळी आप चे प्रदेश संघटन सचिव संदीप देसाई यांनी सांगितले.
कोल्हापूरला आयुक्त मिळण्यासाठी आपचे अंबाबाईला गाऱ्हाणं
|