बातम्या

अमल महाडिक यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपच्या वतीने कोल्हापूर दक्षिणमध्ये संपन्न होणार शासन आपल्या दारी उपक्रम

Aapana Dari initiative will be completed in Kolhapur South


By nisha patil - 6/26/2023 7:36:35 AM
Share This News:



 कुंभोज प्रतिनिधी (विनोद शिंगे)  महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा. श्री. एकनाथजी शिंदे व उपमुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्या संकल्पनेतून जिल्हा पातळीवरील 'शासन आपल्या दारी' हा कार्यक्रम कोल्हापूरमध्ये तपोवन येथे नुकताच पार पडला. आता कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातदेखील माजी आमदार अमल महाडिक यांच्या मार्गदर्शनाखाली कोल्हापूर भाजपच्या वतीने शासन आपल्या दारी हा उपक्रम लवकरच संपन्न होणार आहे.

राज्यातील जनतेला विविध शासकीय योजनांचा लाभ मिळावा आणि त्यांचे जीवन अधिक सुखकर व्हावे यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श ठेवून ‘शासन आपल्या दारी’ हा कार्यक्रम सरकारने आयोजित केला आहे. या अभियानाद्वारे नागरिकांना एकाच छताखाली जलदगतीने विविध योजनांचा लाभ देण्यात येत आहे. यामुळे अनेक नागरिकांना मोठा दिलासा मिळत आहे. कोल्हापूर जिल्ह्यात संपन्न झालेल्या या कार्यक्रमात ७५ हजार उद्दिष्टांच्या दुप्पट म्हणजे १ लाख ५८ हजार लाभार्थ्यांना लाभ देण्यात आला होता. 

याच धर्तीवर भाजपा कोल्हापूरच्या वतीने लवकरच कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघामध्ये शासन आपल्या दारी या उपक्रमाच्या माध्यमातून नागरिकांना विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यात येणार आहे. यामध्ये शासकीय दाखले देखील उपलब्ध करून देण्यात येतील. 

दक्षिण विधानसभा मतदारसंघामध्ये ग्रामीण भागातील 5 जिल्हा परिषद गट व शहरातील प्रभागांनुसार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. लवकरच याचे विभागवार वेळापत्रक जाहीर करून सविस्तर माहिती प्रसिद्धीस देण्यात येईल, तेव्हा या कार्यक्रमामध्ये जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी व्हावे व या उपक्रमाचा लाभ घ्यावा, असं आवाहन अमल महाडिक यांनी कोल्हापूर दक्षिणमधील सर्व नागरिकांना केले आहे.


अमल महाडिक यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपच्या वतीने कोल्हापूर दक्षिणमध्ये संपन्न होणार शासन आपल्या दारी उपक्रम