बातम्या

'खतरों के खिलाडी 13'च्या 'टॉप 5' मध्ये पोहोचला 'आपला माणूस'

Aapla Guy reaches Top 5 of Khatron Ke Khiladi 13


By nisha patil - 11/10/2023 7:20:10 PM
Share This News:



खतरों के खिलाडी हा लोकप्रिय कार्यक्रम आता अंतिम टप्प्यात आला आहे. लवकरच या कार्यक्रमाचा महाअंतिम सोहळा पार पडणार आहे. दरम्यान 'खतरों के खिलाडी 13' या कार्यक्रमाने मला अभिनेता म्हणून तयार करण्यात मदत केली, असं 'आपला माणूस' शिव ठाकरे म्हणाला आहे.

'रोडीज', 'बिग बॉस मराठी सीझन 2'चा विजेता, बिग बॉस सीझन 16 फर्स्ट रनर अप म्हणून शिव ठाकरेने वारंवार त्याच्या चाहत्यांची मनं जिंकली आहेत. आणि आता, तो 'खतरों के खिलाडी सीझन 13'च्या सेमीफायनलमध्ये पोहोचला आहे. लढाऊ भावनेचा विचार केला तर रिअ‍ॅलिटी शो स्पर्धक शिव ठाकरे मिस्टरअनस्टॉपेबल आहे. खतरों के खिलाडी सीझन 13 मधील टॉप 5 मध्येही त्याने आपले स्थान निश्चित केले आहे.
 

एक व्यक्ती म्हणून, माणूस म्हणून खूप काही शिकलो : शिव ठाकरे
'खतरों के खिलाडी 13'च्या टॉप 5 मध्ये पोहोचण्याबद्दल शिव ठाकरे म्हणाले,"KKK 13' मधील माझ्या आतापर्यंतच्या प्रवासात मी खूप आनंदी आहे. मेहनत, बाप्पाचा आशीर्वाद आणि चाहत्यांचे प्रेम यामुळे मी आतापर्यंत हे काम केले आहे. मी माझा प्रवास हा नेहमीच शिकण्याचा अनुभव म्हणून पाहतो, मग तो रोडीज असो, 'बिग बॉस मराठी' असो किंवा 'बिग बॉस सीझन 16'. मी एक व्यक्ती म्हणून, माणूस म्हणून खूप काही शिकलो आहे. पण अभिनेता होण्याचे माझे स्वप्न 'खतरो के खिलाडी 13' या कार्यक्रमामुळे साकार होईल.

 

शिव ठाकरे पुढे म्हणाला,"प्रत्येकाला माहिती आहे की, माझे भविष्यातील लक्ष्य अभिनेता बनणे आहे आणि 'खतरों के खिलाडी' या कार्यक्रमात मला अशी कामे करायला भेटली जी कोणत्याही अॅक्शन थ्रिलर चित्रपटापेक्षा कमी नाहीत. शिवाय, रोहित शेट्टीसारखे अॅक्शन डायरेक्टर सुद्धा आम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी होते.  'खतरों के खिलाडी'च्या सेटवर माझ्या अॅक्शनचं ट्रेनिंग झालं आहे आणि माझ्याकडे डान्स अकॅडमी आहे. त्यामुळे डान्सर म्हणून ही मी तयार आहे. आता मी माझे कौशल्य दाखवण्यासाठी एका मंचाची वाट पाहत आहे,” शिव ठाकरे ने सांगितले. 
 

पहिल्या टास्क पासूनच शिवला कल्पना आली की खतरोंचा प्रवास सोपा होणार नाही. म्हणून, नेहमीप्रमाणे, त्याने कोणताही वाईट पद्धतीचा खेळ न खेळता आणि बाप्पा आणि त्याच्या जनतेवर पूर्ण विश्वास ठेवून प्रत्येक कामासाठी आपले 200% देण्याचे ठरवले.


'खतरों के खिलाडी 13'च्या 'टॉप 5' मध्ये पोहोचला 'आपला माणूस'