बातम्या

अब की बर किसान सरकार

Ab Ki Bar Kisan Sarkar


By nisha patil - 5/7/2023 7:32:22 PM
Share This News:



अब की बर किसान सरकार

कुंभोज प्रतिनिधी (विनोद शिगे) इचलकरंजी शहरासह राज्यांमध्ये भारत राष्ट्र समिती हा तेलंगणातील पक्ष आपल्या स्वतंत्र विचारधारेमुळे संपूर्ण भारतभर विस्तारत आहे. महाराष्ट्राच्या मराठवाड्या  लगतच तेलंगणा राज्य असल्यामुळे मराठवाडयातील जनतेला तेलंगणा सरकारने दिलेल्या सोयी सुविधा चांगल्याच माहित झाल्या त्यामुळे पक्षाचा विस्तार नांदेड, औरंगाबाद येथून सुरुवात होऊन आता महाराष्ट्रतील २८८ विधानसभा मतदारसंघात जोरदारपणे होत आहे. या ठिकाणी सर्व निवडणुका लढवणार यामध्ये लोकसभा विधानसभा जिल्हा परिषद पंचायत समिती ग्रामपंचायत निवडणूक लढवणार असल्याची माहिती बी जी पाटील यांनी पत्रकार बैठकीत माहिती दिली 
अब की बर किसान सरकार   या घोषणेस अनुसरून शेती, शिक्षण, असंघटीत कामगार दीनदलित जनता केंद्रस्थानी धरून तेलंगणा मॉडेल प्रमाणे शेतकऱ्यांना १० हजार रु. एकरी बि बियाणासाठी अनुदान, शेतीला हमीभाव, मोफत शिक्षण, शेतीला मोफत विज व पाणी, पिण्याचे पाणी मोफत, BRS पक्षाच्या सदस्यास २ लाखाचे विमा कवच, कोणीही कसाही मृत्यू झाला तरी ५ लाखाचे विमा कवच, विवाहासाठी १ लाख १६ हजार अनुदान, उद्योगासाठी मागासवर्गीयांना १० लाख अनुदान अशा अनेक क्रांतिकारी योजना चालू केल्या आहेत.

आजची राजकीय स्थिती बघता सर्वच राजकीय पक्षांना सामान्य जनता वैतागली असून या स्थितीमध्ये सर्वसामान्य माणसाला भारत राष्ट्र समिती हा पक्ष जवळचा वाटू लागला आहे. व आगामी सर्व ग्रामपंचायत पासून लोकसभेपर्यंतच्या सर्व जागा सर्वसामान्य कार्यकर्त्यांना बळ देऊन एक नविन इतिहास घडवण्याच्या दृष्टीने व खरेखरे रामराज्य व स्वराज्य निर्माण करण्यासाठी राज्यात नवीन कार्यकर्ते झपाटून कामाला लागले आहेत. इचलकरंजी विधानसभा क्षेत्रात आगामी महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने BRS पक्षाची बांधणी चालू आहे. स्वच्छ सुंदर चरित्राची लोक बी आर एस पक्षांमध्ये घेणार आजी-माजी भ्रष्टाचारी आमदारांना या पक्षांमध्ये जागा राहणार नाही कष्टकरी शेतकरी या पत्रकार बैठकीला बी जी पाटील शशिकांत आमने नीलकंठ भुते आधी जन उपस्थित होते


अब की बर किसान सरकार