बातम्या

अबब ! कोल्हापुरात साचला चप्पलांचा खचच खच

Abba In Kolhapur there is a lot of slippers


By nisha patil - 9/29/2023 5:14:13 PM
Share This News:



संपूर्ण महाराष्ट्राच लाडक आराध्य दैवत म्हणजे गणपती बाप्पा. लहानापासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच गणपती  बाप्पा प्रिय आहे . महाराष्ट्रात  तर गणेश उत्सव हा सण अगदी थाटामाटात साजरा केला जातो. यातच कोल्हापूर करांसाठी गणेश उत्सव म्हणजे अगदी जिव्हाळयाचा विषय. गणपतीच्या आगमनापासून  ते  गणपती मिरवणुकी पर्यंत कोल्हापूरकरांचा  उत्साह आणि जल्लोष हा पाहण्या सारखाच असतो. 
       

कोल्हापुरातील वेगवेगळ्या गणेश मंडळाचे देखावे असो अथवा गणेश मंडळाची  सजावट  हे पाहण्यासाठी तर फक्त शहरातीलच नव्हे तर  ग्रामीण भागातूनही  लोकं  येत असतात.  गणेश विसर्जनाला तर लाखों पेक्षा जास्त भाविकांची गर्दी  मिरवणूकीत  बघायला मिळते . आपल्या लाडक्या बाप्पाला शेवटचा निरोप देण्यासाठी भाविकांमध्ये जल्लोषाचे वातावरण बघायला मिळते .
   

दरवर्षी प्रमाणे या ही वर्षी तोच  जल्लोष पाहायला मिळाला. या वर्षी तरुणाई मिरवणुकीत इतकी बेभान होती कि त्यांना स्वतःच्या चपला निघाल्याचे ही  भान नव्हते.  आज महानगरपालिकेचे कर्मचारी
 रस्त्यांची स्वच्छता करत असताना ठिकठिकाणी चपलांचा खच पाहायला मिळाला. मिळालेल्या माहितीनुसार महानगर कर्मचाऱ्यांनी चक्क ३ ट्रक चप्पला गोळा केला. यावरून  चापलांच्या  साठावरून आपल्याला  गणपती विसर्जन मिरवणुकीला भाविकांकडून मिळालेल्या उदंड प्रतिसादाचा अंदाज येतो.


अबब ! कोल्हापुरात साचला चप्पलांचा खचच खच