बातम्या
अभिषेक घोसाळकर हत्याप्रकरणेवर सुषमा अंधारेंचा सवाल म्हणाल्या
By nisha patil - 2/15/2024 5:42:53 PM
Share This News:
मुंबई : ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्या हत्येबाबत शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी नवीन खुलासा करत तपास यंत्रणेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. घोसाळकरांची हत्या करून मॉरिस नोरोन्हा याने देखील आत्महत्या केल्याचे सांगितले जाते. पण आत्महत्या करणारा व्यक्ती स्वतःला चार गोळ्या मारुन घेऊ शकतो का? असा सवाल उपस्थित करत या हत्येमध्ये वेगळंच काहीतरी असण्याची शक्यता अंधारेयांनी बोलून दाखवली. हत्या करण्याआधी फेसबुक लाईव्हमध्ये मॉरिस आणि घोसाळकर यांच्याभोवती मृत्यूचे सावट दिसत नाही. कदाचित घोसाळकरची हत्या मॉरिसनी केलेली ही नसावी. कारण सीसीटीव्ही फुटेजमध्ये मेहुल नावाचा व्यक्तीदेखील दिसत आहे. या हत्येच्या संबंधी सुषमा अंधारे यांनी अनेक प्रश्न उपस्थित करत गृह विभागावर निशाणा साधला आहे.
नारायण राणे यांना लगावला टोला
भाजपच्या राज्यसभा उमेदवारांची यादी नुकतीच जाहीर झाली असून या यादीमध्ये काँग्रेस मधून भाजपमध्ये आलेल्या आयात उमेदवारांची नावे असून याबाबत उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, आम्हाला आनंद आहे काही काळ सहकारी म्हणून एकत्र राहिलेले ते लोक आहेत मी त्या सर्वांचे अभिनंदन करते. मात्र, नारायण राणे यांचे 'नारायण भाऊ' असे नाव घेत त्यांच्या दुःखात सहभागी असल्याचा टोला लगावला. मूळ भाजपच्या लोकांना उमेदवारी न देता आमच्या काँग्रेसच्या उमेदवारांना राज्यसभेची उमेदवारी दिली याबद्दल त्यांनी भाजपचे आभार मानले आहेत.
अभिषेक घोसाळकर हत्याप्रकरणेवर सुषमा अंधारेंचा सवाल म्हणाल्या
|