बातम्या

पवित्र श्रावण महिन्याच्या चौथ्या सोमवार निमित्त इचलकरंजीत महादेव मंदिरात अभिषेक व आरती

Abhishekam and aarti at Ichalkaranjit Mahadev Temple on the fourth Monday of the holy month of Shravan


By nisha patil - 8/26/2024 3:50:30 PM
Share This News:



पवित्र श्रावण महिन्याच्या चौथ्या सोमवारच्या निमित्ताने गावभाग, इचलकरंजी येथील पुरातन महादेव मंदिरात आमदार प्रकाशआण्णा आवाडे आणि जिल्हा परिषद सदस्य डॉ. राहुल आवाडे यांच्या उपस्थितीत महादेवास अभिषेक अर्पण करून आरती करण्यात आली. कार्यक्रमानंतर सर्व भक्तांना खिचडीचे वाटप करण्यात आले. यावेळी बाळासाहेब कलागते, बाबासाहेब पाटील, राहुल घाट, किशोर पाटील, बाळासाहेब माळकर, शुभम पाटील, राजू दरीबे, बाळासो मोकाशी, दिपक स्वामी, गुंडू गोरे, अनिकेत गुरव, आकाश कित्तुरे, महादेव कुंभार, सागर पाटील, पप्पू कित्तुरे, मधू गुरव, विजय गुरव आणि सुधाकर गुरव यांच्यासह भाविक उपस्थित होते.


पवित्र श्रावण महिन्याच्या चौथ्या सोमवार निमित्त इचलकरंजीत महादेव मंदिरात अभिषेक व आरती