बातम्या

श्री अंबाबाई देवीचं अवभृत स्नान सोहळा

Abhrit bathing ceremony of Sri Ambabai Devi


By nisha patil - 12/8/2023 5:29:14 PM
Share This News:



साडेतीन शक्तीपीठांपैकी एक शक्तीपीठ असलेल्या कोल्हापुरातील करवीर निवासिनी श्री अंबाबाई देवीचा आज अवभृत स्नान सोहळा पंचगंगा नदीमध्ये संपन्न झाला. अधिक श्रावण मासानिमित्त धार्मिक अनुष्ठान समाप्तीनंतर आज सकाळी करवीर निवासिनी श्री अंबाबाई देवीची उत्सव मूर्ती पालखीतून शाही लवाजम्यासह पंचगंगा नदीकडे रवाना झाली यानंतर गंगा नदी मध्ये श्री अंबाबाई देवीचा विधिवत अवभृत स्नान सोहळा पार पडला. हा सोहळा पाहण्यासाठी या ठिकाणी आंबा मातेच्या भक्तांनी मोठी गर्दी केली होती. पंचगंगा नदीवर विविध धार्मिक विधीनंतर श्री अंबाबाई देवीची पालखी पुन्हा मंदिराकडे मार्गस्थ झाली.
 

पारंपारिक वाद्यांच्या गजरासह सनई चौघड्यांच्या तालात मिरवणूक मार्गावर प्रसन्न वातावरण निर्माण झाले होते. पालखी मार्गावर जागोजागी फुलांच्या पायघड्या रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या त्याचबरोबर भाविकांनी देखील देवीच्या दर्शनासाठी गर्दी केली होती.


श्री अंबाबाई देवीचं अवभृत स्नान सोहळा