बातम्या

पोटात लाथ मारल्यामुळे विवाहितेचा गर्भपात

Abortion of a married woman due to a kick in the stomach


By nisha patil - 2/6/2023 9:01:38 PM
Share This News:



तारा न्यूज वेब टीम विवाहितेच्या पोटात लाथ मारल्यामुळे तिचा गर्भपात झाल्याची धक्कादायक घटना पुण्यातील वाघोली  परिसरात घडली आहे. या प्रकरणी विवाहितेने लोणीकंद पोलीस ठाण्यात तक्रार दाखल दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी राहुल मुकेश पवार आणि करण मुकेश पवार या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. दोघांनाही अटक करण्यात आली आहे.
 तक्रारदार विवाहिता आणि आरोपी हे वाघोली परिसरातील विटाळकर चाळीत राहतात आणि ते एकमेकांचे शेजारी आहेत. 26 मे रोजी गर्भवती महिला तिच्या आईसोबत घराजवळच फेऱ्या मारत होती. यावेळी आरोपी राहुल पवारने गर्भवती महिलेच्या आईला शिवीगाळ केली. तसंच तुझी मुलगी कधीच सुखी वैवाहिक जीवन जगू शकणार नाही, अशी धमकीही दिली.
यावरुन भांडण अधिकच वाढलं. यानंतर आरोपी राहुल पवार आणि करण पवार या दोघांनी गर्भवती आणि तिच्या आईला दगड फेकून मारला. शिवाय राहुल पवार याने महिलेच्या पोटात लाथ मारली. यानंतर गर्भवती महिला वेदनेने विव्हळत खाली कोसळली. रक्तस्राव झाल्याने तिला तातडीने ससून रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र तिथे पोहोचल्यानंतर या महिलेचा गर्भपात झाल्याचं डॉक्टरांनी पोलिसांना सांगितलं. तर या प्रकरानंतर आरोपी राहुल पवार आणि करण पवार तिथून पळून गेले. 
महिलेच्या तक्रारीनंतर लोणीकंद पोलिसांनी गुन्हा दाखल करुन आरोपींचा शोध सुरु केला. पोलिसांना राहुल पवार आणि करण पवार या दोन आरोपींना अटक करण्यात यश आलं आहे.


पोटात लाथ मारल्यामुळे विवाहितेचा गर्भपात