बातम्या
कोल्हापूर जिल्ह्यातील सुमारे ५१ हजार दूध उत्पादक अनुदानापासून राहणार वंचित
By nisha patil - 3/25/2024 4:59:13 PM
Share This News:
कोल्हापूर जिल्ह्यातील सुमारे ५१ हजार दूध उत्पादक अनुदानापासून राहणार वंचित
राज्य शासनाच्या गाय दूध अनुदानापासून जिल्ह्यातील सुमारे ५१ हजार १३३ शेतकरी अनुदानापासून वंचित राहणार आहेत. आतापर्यंत पहिल्या दहा दिवसात (११ ते २० जानेवारी) ४० हजार शेतकऱ्यांनाच अनुदान मिळणार आहे. जिल्ह्यातील गाय दूध संकलन पाहता दहा दिवसात ६ कोटी रुपये अनुदान मिळणे अपेक्षित होते मात्र, २ कोटी ५९ लाख रुपये अनुदान मिळणार आहे. जाचक अटी आणि तांत्रिक अडचणीमुळे पात्र शेतकरी अपात्र ठरणार आहेत.
गाय दुधाचे दर कमी झाल्याने राज्य शासनाने गाय दूध उत्पादकांना दोन महिन्यासाठी (११ जानेवारी ते १० मार्च २०२४ अखेर) प्रतिलिटर पाच रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार निकष देऊन दूध उत्पादकांसह पशुधनाची माहीती ऑनलाइन भरण्याची सूचना दिली. जिल्ह्यात ‘गोकुळ’चे सर्वाधिक ८१ हजार गाय दूध उत्पादक आहेत. मात्र, माहिती भरण्याची प्रक्रिया क्लिष्ट असल्याने अनेक शेतकऱ्यांना सहभाग घेता आला नाही. तर काहींनी मराठीतच माहीती भरल्याने तांत्रिक कारणामुळे अपात्र ठरले आहेत.जिल्ह्यात आतापर्यंत ‘गोकुळ’, ’वारणा’, ‘वैजनाथ’ दूध संघांच्या २४ हजार ५९० शेतकऱ्यांच्या खात्यावर १ कोटी ५१ लाख ५९ हजार रुपये जमा झाले आहेत. आता १ काेटी १ लाख ५२ हजार रुपये वर्ग होण्याची प्रक्रिया सुरू आहे. मात्र, जिल्ह्यात ९१ हजार ६०१ गाय दूध उत्पादक शेतकरी आहेत. त्यापैकी ४० हजार ४६६ शेतकऱ्यांना अनुदान मिळणार आहे. उर्वरित जवळपास ५१ हजार शेतकरी वंचित राहण्याची शक्यता आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील सुमारे ५१ हजार दूध उत्पादक अनुदानापासून राहणार वंचित
|