बातम्या

करवीर निवासिनी श्री अंबाबाईला भाविकांकडून भरभरून दान

Abundant donation from devotees to Shri Ambabai


By nisha patil - 7/14/2023 5:44:28 PM
Share This News:



करवीर निवासिनी श्री अंबाबाईला भाविकांकडून भरभरून दान

करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात गेल्या तीन दिवसांपासून दानपेट्यांमधील रकमेची मोजदाद सुरु होती.  मंदिराच्या दानपेट्यात 62 लाaख 36 हजार 830 रुपयांचे भाविकांकडून दान देण्यात आले आहे. पेटी क्रमांक 4 मधून सर्वाधिक 18 लाख 16 हजार 767 रुपयांचे दान मिळाले.मंदिरात गेल्या तीन दिवसांपासून सुरु असलेली मोजदाद आज समाप्त झाली.मंदिराच्या दानपेट्यात 62 लाख 36 हजार 830 रुपयांचे भाविकांकडून दान देण्यात आले आहे.पेटी क्रमांक 4 मधून सर्वाधिक 18 लाख 16 हजार 767 रुपयांचे दान मिळाले.अंबाबाई मंदिरातील दानपेट्या भरल्यानंतर साधारण पावणे दोन महिन्यांनी देवस्थान समितीकडून रक्कम मोजली जात होती.त्यामुळे मोजदाद करण्यासाठी बराच वेळ जात होता.त्यामुळे आता साधारण 26 दिवसांनी दानपेट्या उघडून मोजदाद केली जात आहे.त्यानुसार सोमवारपासून पेट्यांमधील रकमेची मोजदाद सुरू होती.गेल्या दोन दिवसांत 61 लाख 38 हजार 765 रुपयांची भर पडली होती.चिल्लरसह मोजणी पूर्ण झाली असून अखेरच्या दिवशी 98 हजार 65 रुपयाची भर पडली.


करवीर निवासिनी श्री अंबाबाईला भाविकांकडून भरभरून दान