बातम्या

गोकुळ शिरगावात शिवीगाळ करुन मारहाण

Abused and beaten in Gokul Shirgaon


By nisha patil - 3/30/2024 8:13:37 PM
Share This News:



कोल्हापूर : प्रतिनिधी गोकुळ शिरगावयेथील ज्योती अनिल पाटील यांचे पाटील इलेक्ट्रीक  दुकान हे आमच्या राहत्या घराच्या खालीच आहे. सदर किराणा माल दुकान हे मेन रस्त्यालगतअसुन या दुकानाचे मागे सुधीर कृष्णराव शनाय याची प्रॉपर्टी आहे. सुधीर कृष्णराव शनाय यांचे प्रॉपर्टीचे समोर

आमचे रहाते घर व किराणा मालं दुकान असुन ते त्यांना अडचणीचे ठरत असल्याने त्यांचा मुलगा अक्षय सुधीरशनॉय वारंवार काही ना काही तरी कारणावरुन गेली 6 वर्षापासुन भांडण तंटा, वाद विवाद, मारामारी होण्याच्याहेतुने स्वतः व इतर लोकांची मदत घेवुन नेहमीच वाद करत असतात.दि.26/03/2024 रोजी रात्री 8.30वा. चे सुमारास मी आमचे पाटील किराणा मालाचे दुकानात असताना सचिनप्रल्हाद घोडके हा तेथे आला व मला म्हणाला की, तुझा पती सुनिल हा कोठे आहे त्याला आमचे ताब्यात द्या त्यानेमला मारायची सुपारी दिली आहे. त्याला आम्ही बघुन घेतो असे म्हणु लागला त्याचेसोबत त्याचवेळी अक्षय सुधीर

शनॉय, संदीप विष्णु पाटील, हर्षद सचिन घोडके, चेतन सचिन घोडके, अक्षय संजय पाटील, रोहीत उर्फ गोठया राजुदंडगल असेही दंगा करीत होते. त्याचवेळी त्याठिकाणी माझा मावस भाऊ सागर मारुती गुरव हा आला व तो सचिनप्रल्हाद घोडके यास समजावुन सांगत असताना त्यालाही तो शिवीगाळ करु लागला त्यावेळी रोहीत उर्फ गोठया राजु

 दंडगल याने त्याचेजवळील चाकु काढुन तु येथुन जातोस का तुला बघु असे म्हणुन तेथुन सर्वजण निघुन गेले.दि.27/03/2024 रोजी सुमारास मी तसेच माझे पती सुनिल, सासु रेणुका, सासरे सोनाप्पा,जाऊ ज्योती, माझी दोन मुले, दिरांची दोन मुले असे घरी असताना आमचे घरासमोर कोणीतरी मोटर सायकलजोराने रेस करुन शिवीगाळ करुन निघुन गेला थोडयावेळाने पुन्हा परत येवुन मोटर सायकल जोराने रेस करुनशिवीगाळ करु लागल्याने मी बाहेर गॅलरीत जावुन पाहिले असता मोटर सायकलवर चेतन सचिन घोडके हा होता वतो आमचे घराकडे हात करुन शिवीगाळ करत होता म्हणुन मी त्याला विचारणा करण्याकरीता खाली आले त्यावेळी

त्याचे पाठोपाठ गल्लीमध्ये अक्षय संजय पाटील, सचिन प्रल्हाद घोडके, हर्षद सचिन घोडके, रोहीत उर्फ गोठया राजु दंडगल हे देखील आले होते. माझे पाठोपाठ माझे घरचे देखील गल्लीत आले आम्ही तेथे आलेले इसमांना आम्हांला शिवीगाळ का करत आहात याबाबत विचारणा करत असताना त्यांनी आम्हांला लाथाबुक्यांनी मारहाण करुन परत शिवीगाळ केली. तसेच अक्षय पाटील याने माझे केस ओढले त्यावेळी तेथे जमलेले भिकाजी बंडु पोवार, अजित

ईश्वरा कांबळे, नितीन दगडु कांबळे, प्रदीप यशवंत मोहीत, दादासो शंकर कांबळे यांनी आमची सोडवा सोडव केली.त्यानंतर मी व माझे पती सुनिल असे पोलीस ठाण्याकडे आलो असता मला माझा मावस भाऊ सागर मारुती गुरवयाने फोन करुन सांगितले की, आपले घरासमोर अक्षय संजय पाटील, सचिन प्रल्हाद घोडके, हर्षद सचिन घोडके,रोहीत उर्फ गोठया राजु दंडगल, चेतन सचिन घोडके, अक्षय सुधीर शनॉय, संदीप विष्णु पाटील व अनोळखी 5 ते10 लोकांनी शिवीगाळ करुन घरावरती दगड, बाटल्या फेकल्या.  त्यानंतर आम्ही थोडया वेळाने घरी जावुन पाहिले असता आमचे घराचे गॅलरीत काचेच्याबाटल्याचे तुकडे व दगड पडलेले दिसले तसेच आमचे गॅलरीस अडकलेला सॅमसंग मोबाईलचे जाहिरातीचे इलेक्ट्रीक

बोर्डचे दगड मारुन नुकसान केलेले दिसुन आले. सदरची घटना झाले दिवसापासुन सचिन प्रल्हाद घोडके वारंवार माझे दिर अनिल सोनाप्पा पाटील व माझा मावस भाऊ

सागर मारुती गुरव यांना जीवे मारण्याची धमकी देत असल्याने आम्ही घरातील सर्व लोक घाबरुन घरीच होतो. यामुळे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तसेच घरी असताना अक्षय संजय पाटील, सचिन

प्रल्हाद घोडके, हर्षद सचिन घोडके, चेतन घोडके, संदीप विष्णु पाटील, सर्व रा. सिध्दार्थनगर, गोकुळ शिरगांव यांच्या विरुध्द पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केला आहे.

 


गोकुळ शिरगावात शिवीगाळ करुन मारहाण