विशेष बातम्या

आमचा पराभव मान्य, निकालाचे आत्मपरीक्षण करणार; सतेज पाटलांची प्रतिक्रिया

Accepting our defeat, will introspect the result; Satej Patel's reaction


By nisha patil -
Share This News:



कोल्हापूर प्रतिनिधी  छत्रपती राजाराम साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी पूर्ण ताकदीने उतरूनही एकतर्फी पराभवाला सामोरे जावं लागल्यानंतर आमदार सतेज पाटील यांनी पराभव मान्य केला आहे. वाढीव सभासदांमुळे पराभव झाल्याचे त्यांनी म्हटले आहे. पण आम्ही आमचा पराभव मान्य केला असून या निवडणुकीत प्रचाराची पातळी खाली गेली ती जायला नको होती, असेही ते म्हणाले. सत्ताधाऱ्यांनी जी आश्वासन दिली त्या पूर्ण करावीत, असेही त्यांनी सांगितले. पराभवाने आम्ही थांबणार नसून कोल्हापूरच्या प्रलंबित प्रश्नांवर लक्ष केंद्रित करणार आहे. दोन दिवसांत थेट पाईपलाईनची पाहणी करणार असल्याचे त्यांनी सांगितले. निवडणुकीत प्रचाराची पातळी घसरल्याचे त्यांनी मान्य केले.   
दरम्यान सतेज पाटील यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले की, आम्ही निवडणूक जिंकू शकलो नाही त्याची काही कारणं आहेत. आमचे तगडे उमेदवार जाणीवपूर्वक बाद करण्यात आले. बाहेरचे काही वाढीव सभासद असल्याने हा पराभव झाला. पण आम्ही आमचा पराभव मान्य केला आहे. या निवडणुकीत प्रचाराची पातळी खाली गेली, ती जायला नको होती. ते पुढे म्हणाले की, आमच्यावर विश्वास दाखवणाऱ्या सभासदांच्या पाठीशी कायम राहणार आहे. पाटील यांनी सत्ताधाऱ्यांना अपेक्षित मतदान झालं नसल्याचा दावा केला. वाढीव सभासद हाच मुद्दा महत्वाचा ठरला आहे. खोटे आधारकार्ड तयार करून मतदान करण्यात आलं. खोटे आधारकार्ड असलेले 200 मतदार मागे गेले. कसबा बावड्यात गेल्यावेळी मतं मिळाली तितकीच मतं मिळाली. मृत सभासदांचे शेअर्स ट्रान्स्फर केले नाहीत, नाहीतर आणखी मतं वाढली असती.


Accepting our defeat, will introspect the result; Satej Patel's reaction