बातम्या
शाहू टोल नाका येथे दोन चारचाकी गाड्यांचा अपघात
By nisha patil - 2/25/2025 8:43:27 PM
Share This News:
शाहू टोल नाका येथे दोन चारचाकी गाड्यांचा अपघात
कोल्हापूर: शाहू टोल नाका येथे २५ फेब्रुवारीच्या मध्यरात्री १.१५ वाजता दोन चारचाकी गाड्यांचा अपघात झाला. या अपघातात दोन्ही गाड्यांचे मोठे नुकसान झाले असून, तिघेजण जखमी झाले आहेत.
फिर्यादी बाजीराव दत्तू ओंबासे (वय ५६, रा. चिंतामणी कॉलनी, कसबा बावडा, कोल्हापूर) यांच्या तक्रारीवरून राजारामपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कसा झाला अपघात?
सिद्धांत सुनील पोवार (वय २७, रा. जाधव पार्क, रामानंदनगर, कोल्हापूर) हे त्यांची वोक्सवॅगन वेन्टो (MH-04-FZ-0609) ही कार भरधाव वेगाने चालवत होते. शाहू टोल नाक्याजवळ त्यांनी रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या टाटा कंपनीच्या चारचाकी गाडी (MH-09-CU-7518) ला मागून जोरदार धडक दिली.
या अपघातात दोन्ही गाड्यांचे मोठे नुकसान झाले असून, कारमधील करण जयसिंग भंडारी आणि वैभव भाले हे जखमी झाले आहेत.
गुन्हा दाखल
सिद्धांत पोवार यांच्या विरोधात भादंवि कलम २८१, १२५ (अ), १२५ (ब) तसेच मोटर वाहन कायद्याच्या कलम १८४, १३४ (अ), १३४ (च) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास राजारामपुरी पोलीस करत आहेत.
शाहू टोल नाका येथे दोन चारचाकी गाड्यांचा अपघात
|